उषाकिरण आत्राम पेनवासी मधुकर मडावी साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित, दुसरी आदिवासी साहित्य परिषद वणी येथे संपन्न

56

उषाकिरण आत्राम पेनवासी मधुकर मडावी साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित, दुसरी आदिवासी साहित्य परिषद वणी येथे संपन्न

 अमित सुरेश वैद्य

 सालेकसा तालुका प्रतिनिधि

 मो: 7499237296

तालुक्यातील धनेगाव येथील रहिवासी गोंडी साहित्यिक उषा किरण आत्राम यांना साहित्य व समाजसेवा योगदानासाठी पेनवासी मधुकर मडावी साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आला. २४ जून रोजी वनी येथे झालेल्या दुसऱ्या आदिवासी साहित्य परिषद या कार्यक्रमांमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आला. 

दहा हजार रुपये रोख सोल श्रीफळ समानचित्र स्मृतीचिन्ह असा या पुरस्काराच्या स्वरूप होता. आदिवासी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य वसंतराव कन्नाके, सचिव रामचंद्र आत्राम, धनराज मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार वितरण करण्यात आले. उषा किरण आत्राम यांच्या गोंडी साहित्य आणि समाजकार्यात भरीव कामगिरीमुळे समाजाला वेगळी ओळख निर्माण करण्यासोबतच ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी म्हणून या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 

यावेळी मंचावर उद्घाटक प्रभू राजगडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष कुसुम अलाम, गीत घोष, ल. सू. राजगडकर असे मान्यवर उपस्थित होते.