महामार्गावर होणारे अपघात कसे टाळाता येतील ? करा या उपाययोजना…

53

वाढते भयावह अपघात पहाता नियमांचे पालन करा व वाहनावर नियंत्रण ठेवा

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.९९२१६९०७७९

दिनांक १ जुलै २०२३ ला समृद्धी महामार्गावर भयावह व अंगावर शहारे येणारा भीषण अपघात झाला.यात २५ लोकांचा होरपळून मृत्यू झाला.यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात शोककळा पसरली.यापाठोपाठ दिनांक ४ जुलैला धुळ्यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरीर शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ कंटेनरच्या धडकेने भीषण अपघात झाला यात १५ जणांचा मृत्यू झाला व २५ पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले.अशाप्रकारे अपघातांची मालिका कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे ही अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे.यावर वाहन चालकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.कारण महाराष्ट्रासह देशात होणारे ८५ टक्के अपघात हे वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा चुकांमुळे होत असल्याचे दिसून येते,तर १५ टक्के अपघात हे प्रशासनाच्या चुकांमुळे होतांना दिसतात.

देशातील अपघातांचा विचार केला तर प्रत्येक तासाला १८ लोकांचा अपघाती मृत्यू होत आहे ही अत्यंत गंभीर, भयावह व चिंताजनक बाब आहे.ज्याप्रमाणे वाहन चालकांसाठी रस्त्यांच्या सुविधा उपलब्ध झाल्यात त्याच गतीने अपघात मोठ्या प्रमाणात होतांना आपण पहातो.  ज्याप्रमाणे राज्यात किंवा देशात रस्त्यांच्या अत्याधुनिक सुख-सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्याच गतीने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.आपले पुर्वज म्हणायचे जेवण सुख तेवढंच दु:ख त्याचीच पुनरावृत्ती सध्या होत आहे की काय असे वाटते.आज सुखाच्या भोवऱ्यात आपल्याला दुःखाचा कळस पहायला मिळतो. राज्याच्या जनतेच्या सुविधांच्या दृष्टीकोनातून ७०१  किलोमीटर लांबीचा नागपूर ते मुंबई हा नागपूर द्रूतगती मार्ग (समृध्दी महामार्ग) बनविण्यात आला.या मार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ झाले.समृध्दी महामार्ग राज्याच्या दहा जिल्ह्यांतून जातो.त्याचप्रमाणे ३९० वेगवेगळ्या खेड्यांना वळसा देवुन जातो.परंतु वाहन चालक आपल्या वाहनाच्या गतीवरील नियंत्रणात न ठेवता वाहन चालवितांना निदर्शनास आले आहे.त्यामुळे आतापर्यंत समृध्दी महामार्गवर अपघातांचा मालिका सुरूच असल्याचे दिसून येते.परंतु अपघाताचे प्रमाण थांबता थांबेना ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.

गेल्या सहा महिन्यांपासुन ४५० अपघात व ९७ च्या  वर बळी गेलेत.  म्हणजेच दररोजचा एक अपघात अशी परिस्थिती समृध्दी महामार्गावरील असल्याचे दिसून येते.समृध्दी महामार्गावरील वेगमर्यादेत थोडीशी ही चुक मोठे अपघाताचे कारण ठरू शकते व ठरत आहे.समृध्दी महामार्गावरील वाढते अपघात पहाता सरकारने ठोस पावले उचलण्याची नितांत गरज आहे.याकरिता प्रत्येक ५० किलोमीटर अंतरावर थांबे आवश्यक आहेत.कारण इंजिन गरम होणे,टायर गरम होणे,वाहन चालकाला थकवा येणे,यामुळे होणारे अपघात यावर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होईल व वाहन चालकांना विश्रांती मिळेल यामुळे अपघात टाळता येईल.त्याचप्रमाणे वाहन चालकांनी वाहन चालवीतांना डोळ्यात तेल टाकून वाहन चालवायला पाहिजे.कारण गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे इतर अपघातांचा विचार केला तर रोडचे खड्डे, रोडचे बांधकाम यामुळे सर्वसामान्यांना आवागमन करण्यास मोठी अडचण निर्माण होते. रोडचे काम सुरू असताना वनवे ट्राफीक असते अशाच ठिकाणी अपघाताचे प्रमाण सुध्दा जास्त दिसून येते.अशाप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याचे आपण पहातो.कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या कामानिमित्त किंवा नौकरीवर जात असतो.परंतु वाढते रोडचे अपघात पहाता  प्रत्येकामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होने सहाजिकच आहे. यावरून स्पष्ट होते की घरून निघालेला व्यक्ती वापस घरी सुखरूप पोहचेलच याची काहीही हमी नसते ही बाब सध्याच्या होणाऱ्या वाढत्या अपघातावरून लक्षात येते.

कोणताही अपघात असो यात एकालाच दोष देता येणार नाही.वाहन चालकांनी आपल्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असते.त्याचप्रमाणे दुचाकी वाहन चालकांनी घरून निघताना हेल्मेट घालुनच निघायला हवे.कारण कोणताही अपघात सांगुन येत नाही.त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात स्वतःचा जीव स्वतःलाच सांभाळायचा आहे.वाहन चालवितांना दुचाकी असो अथवा चारचाकी असो आपल्या वाहणाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.त्याचप्रमाणे सरकारने व वाहतूक प्रशासनाने दुर्घनांच्या ठिकाणी जातीने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.रोडचे अपघात रोखण्यासाठी सरकार, प्रशासना व नागरिक यांच्यात समन्वय असायला हवा.त्याचप्रमाणे वाहतुकीच्या बाबतीत सरकारने किंवा वाहतूक प्रशासनाने घालून दिलेल्या संपूर्ण नियमांचे काटेकोरपणे पालन करणे संपूर्ण नागरिकांचे प्रथम कर्तव्य बनते. कारण “जान है तो जहान है” हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारला पाहिजे. परंतु राज्यातील अनेक भागात टिप्पर,ट्रक चालकांच्या व इतर वाहनचालक यांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.याचे अनेक जीवंत उदाहरण सर्वांच्या डोळ्यासमोर आहे.यावर वाहतूक प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे.

राज्यात व देशात अपघातांची वाढती संख्या अत्यंत चिंताजनक व धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येते.त्यामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.वाहन चालकांनी लांब प्रवास करतांना आपल्या वाहनांची हवा वेळोवेळी तपासली पाहिजे.त्याच प्रमाणे समृध्दी महामार्गावरील वाढते अपघात हे वेगवान गाडीच्या गतीमुळे टायर गरम होतात यामुळे सुध्दा अपघात होत असल्याचे सांगितले जाते.याकरिता वाहनांची हवा वेळोवेळी तपासने व थोडी-थोडी वाहनांला विश्रांती देणे गरजेचे आहे वाहन चालकांला सुस्ती येणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी.

यामुळे अपघातावर आळा बसु शकतो. वाहन चालवितांना मुख्यत्वे करून मोबाईलचा वापर करूच नये,मद्य प्राशन करून ड्रायव्हिंग करू नये, सिग्नलला वाहन जंप करू नये, कुठेही जातांना वेळेच्या आधी निघावे जेनेकरून वाहन चालवीतांना घाई-गडबड होणार नाही, मागेपुढे चालत असलेल्या वाहनांना ओव्हर टेक करू नये,आपल्या वाहनांचे हॉर्न, ब्रेक,इंडीगेटर सदैव व्यवस्थीत व सुरळीत असायला हवे व वेळप्रसंगी अप्पर-डीप्परचा वापर सुध्दा करावा.या संपूर्ण महत्वपूर्ण बाबींचा योग्यवेळे वापर व्हायलाच हवा जेनेकरून अपघात रोखण्यास मोठी मदत होईल.त्याचप्रमाणे वाहन चालवितांना नेहमीच सतर्कता बाळगली पाहिजे.वाढते अपघात पहाता प्रशासनाने  योग्य पाऊल उचलावेत व वाढते अपघात टाळण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करावे. वाहनावर नियंत्रण ठेवा आणि अपघात टाळा.