Home latest News दीक्षाभूमीवर मूलभूत सोयी उपलब्ध करण्याची मागणी

दीक्षाभूमीवर मूलभूत सोयी उपलब्ध करण्याची मागणी

58

दीक्षाभूमीवर मूलभूत सोयी उपलब्ध करण्याची मागणी

दीक्षाभूमीवर मूलभूत सोयी उपलब्ध करण्याची मागणी

त्रिशा राऊत नागपुर ग्रामीण प्रतिनिधीं
9096817953

नागपुर . नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनेक मूलभूत सुविधा आणि आवश्यक गरजांच्या पूर्ततेचा अभाव आहे. गेल्या कित्येक वर्षापासून येथे अनेक सुविधा उपलब्ध नाहीत. याबद्दल बौद्ध उपासक व उपासीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दीक्षाभूमीवर साफसफाई, जागोजागी पाण्याची व्यवस्था, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था, सौंदर्यीकरण, मुतारी, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश योजना नाही. म्हणून या संदर्भात प्रदीप मून यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी तीनशेहून अधिक महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या निवेदनावर स्मारक समितीच्या सचिवांनी योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा महिलांनी दिलेला आहे.