घुग्घुस येथील आगीत जळालेल्या दुकानांची आ. किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
घुग्गुस : 9 जुलै : – घुग्घूस येथील जामा मस्जिद समोर असलेल्या अल – रजा कॉम्प्लेक्स मधील इस्लामीक बुक हाउस व येथील कापडाच्या दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान आ. किशोर जोरगेवार यांनी जळलेल्या दुकानांची पाहणी करुन आगीच्या कारणाची माहिती घेतली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अल – रजा कॉम्प्लेक्स मधील इस्लामीक बुक हाऊस व येथील कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. काही तासाच्या प्रयत्नांनंतर नंतर या आगीवर नियत्रंण मिळविण्यात आले. मात्र तोवर दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आ. जोरगेवार यांनी घुग्घूस येथे जळालेल्या दुकानाची पाहणी केली. यावेळी दुकानमालकांसोबतही आमदार किशोर जोरगेवार यांनी चर्चा करुन आगीमागचे कारण समजून घेतले. शॉट सर्किट झाल्याने ही आग लागली असावी असा प्राथमीक अंदाज वर्तविल्या जात आहे.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घूस युवा नेते इमरान खान, स्वप्नील वाढई, नागेश तुराणकर, राजू नातर, राजू सूर्यवंशी, आकाश चिलका, मयूर कलवल, विक्की सोदारी, भोंगडे आदींची उपस्थिती होती.