थायलंड आणि बांगलादेशच्या विदेशी पाहुण्यांच्या उपस्‍थितीत चंद्रपुरमधील विद्यार्थी सन्मानित…

49

थायलंड आणि बांगलादेशच्या विदेशी पाहुण्यांच्या उपस्‍थितीत चंद्रपुरमधील विद्यार्थी सन्मानित

रोशन लोणारे 

चंद्रपूर प्रतिनिधी

मो: 9130553551

चंद्रपूर: येथील सेंट मायकेल सीबीएससी स्कूल येथे वर्ल्ड पीस एथिक्स कॉन्टेस्ट क्लब, थायलंड गगन मलिक फाउंडेशन तसेच अहिल्याबाई होळकर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड पीस एथिक्स स्पर्धेचा पुरस्कार समारंभ २०२३ चे आयोजन थायलंड आणि बांगलादेशांतील प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

 आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. ही स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली असून गट अ मधील बल्लारपूर पब्लिक स्कूल येथील विद्यार्थिनी कनका मून व गट ब मध्ये विद्या विहार स्कूल चंद्रपूर येथील विद्यार्थिनी ग्रंथा वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्हे, प्रमाणपत्र तसेच शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी वरिष्ठ सल्लागार व्हेनरेबल भंते कीर्ती, थायलंडचे वर्ल्ड पीस एथिक्स क्लब, संचालक डॉ. पेटचरत, वर्ल्ड-पीईसीच्या सीईओ सिस्टर. मिथिला, मिस अंजली, सोम्बून, नितीनजी गजबिये, प्रणाली कोल्हेकर,प्राचार्या सेंट मायकल इंग्लिश स्कूल सीबीएसई चंद्रपूर, चंद्रपूर महानगराचे महामंत्री तथा संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष , ब्रिजभूषण पाझारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी परीक्षेचे आणि कार्यक्रमाचे आयोजक ,विकास तायडे (जागतिक पीईसी-राष्ट्रीय परीक्षा समन्वयकव ) ,अमित वाघमारे (जागतिक पीईसी-राष्ट्रीय परीक्षा समन्वयक), बाळू रामटेके,विशाल बत्तुलवार, आदित्य कोमुलवार,रोशन लोणारे यांनी यशस्वीरीत्या कार्य पार पाडले