संविधान संवाद शाळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
गुणवंत कांबळे
मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०
रत्नागिरी- दि.१२/०७/२०२३ रोजी जि.प.शाळा केंद्र शाळा सापुचे तळे आणि जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा खानवली या दोन शाळांमध्ये भारतीय लोकसत्ताक संघटना व भारतीय सत्यशोधक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान संवाद शाळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी संविधान संवादक अमर पवार तसेच भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचे तालुकाअध्यक्ष प्रथमेश गोरे,भारतीय सत्यशोधक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रथमेश बोडेकर,भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचे जिल्हाअध्यक्ष प्रसेनजीत देवधेकर हे उपस्थित होते.