सातपुडामधील निलीचारी वाघदेव… ‘अशी’ केली जाते या देवाची पूजा

55

अक्कलकुवा तालुक्यातील काठी, निंबीपाडा येथे पारंपारिक पद्धतीने निलीचारीचे पूजन केले…

प्रकाश नाईक

जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार

मो. ९५११६५५८७७

 नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यातील काठी, निबींपाडा येथे वाघदेव निलीचारी या देवाची पूजा करण्यात आली. सातपुडा परिसरात आदिवासी समाज हा निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा नियमांचा अनुसार जगणारा समाज आहेत. त्यामुळे आदिवासींची संस्कृती, रीती रिवाज, रूढी, परंपरा पद्धतीपेक्षा इतर धर्माचा संस्कृतीहून वेगळी आहे. त्यामुळे आदिसींची स्वतंत्र संस्कृती व जीवन जगण्याची शैली अस्तित्वात आहेत.

पाऊस सुरू झाल्यानंतर सगळीकडे हिरवळ परिसर दिसत असतो त्यामुळे नव नवीन गवत, भाज्या,वेली, पाने, फुले यांनी निसर्ग हिरवागार झालेला असतो. तसेच शेतात सुद्धा नवीन पालेभाज्या उगवलेल्या असतात. अशावेळी आदिवासी लोक ही निलीचारी वाघदेव ह्या देवाची पूजा करतात. वनराईतील वनभाजी निली भाजीला , संस्कृतीनुसार निलीचारी वाघदेव पुजाऱ्यांकडून पूजन झाल्यानंतर दऱ्या खोऱ्यातील वनराईत आढळणाऱ्या वनभाजी रितीरिवाजानुसार पूजन केल्यानंतर वनराईतील सगळया वनभाज्या खायला सुरुवात करत असतात. पूजा झाल्यानंतरच जंगलातील पाले भाजी खाता येतात. उदा. आंबडी (खाटो पेंडो), माठ (माटलो), थोपा(आहल्य), शेवळा (पेबडे) यासह सागाचे पाने घरात आणू शकतात.अशा प्रकारे सातपुड्यातील आदिवासी समाज हा या निलीचारी वाघदेव ह्या देवाची पूजा करत असतात.

यावेळी पुंजारा (निसर्गरक्षक ) रायसिंग वसावे, जिऱ्या वसावे, कालूसिंग वसावे, काठी निबींपाडा या गावाचे बिरसा ब्रिगेड अध्यक्ष दिलीप वसावे, प्रताप पावरा, बलवंत वसावे, केशव वसावे, ईश्वर वसावे, श्रावण वसावे, दशरथ वसावे, हारसिंग वसावे, भरत वसावे, पालसिंग वसावे, नोवजा वसावे आदी उपस्थित होते.