श्रीवर्धन तालुक्यात भात लावणीला सुरुवात शेतकरी वर्गात आनंदाचा वातावरण…
सचिन पवार
कोकण ब्युरो चीफ
मो: 8080092301
श्रीवर्धन :-रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वडवली ते दिघी वेळास या आजूबाजूच्या गावामध्ये आणि इतर गावामध्ये पावसाने आज पहाटेपासून जोरदार पणे हजेरी लावली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी आपली शेतीकरण्यास मोठ्या आनंदाने पेरणी नांगरणी करण्यास सुरुवात केली मध्यंतरी पाऊस थोडा -थोडा पडत असल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यात दिलासा मिळत नव्हता काही दिवस तर पाऊस निघून गेला अशा वेळी शेतकरी खूप हलाविल झाला होता पिकांचे आता नुकसान होईल या भीतीने शेतकरी चिंता वस्तेत पडलेला आज कुठे पावसाने चांगली हजेरी लावल्याने तसेच भरपूर दिवसाने पावसाचे आगमन झाले आणि शेतकरी खरं आनंदाने आपली शेती लावण्यात दंग झाला असून आपली शेती करण्यास सुरुवात केली आहे या वेळी घेतलेले छायाचित्रात शेतकरी दिसत आहे..