धक्कादायक… महाडमधील या शाळेत शिरला भामटा पोलीस अधिकारी

55

महाड तालुक्यातील नागाव येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिरला भामटा पोलीस अधिकारी…

सचिन पवार

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

महाड :-महाड तालुक्यातील नागाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिरलेल्या बोगस पोलीस उपनिरीक्षकाला महाड पोलिसांनी रंगेहात पकडून बेडया ठोकल्या आहेत. दि.१४ जुलै रोजी न्यू इंग्लिश स्कूल नागावमध्ये स्वतःला पोलीस अधिकारी मी आहे असे सांगून प्रवेश केला होता मी रायगड पोलीस वाहतूक शाखेचा ए पी आय आहे असे सांगत होता यावेळी शालेय कमिटी यांना त्याच्याकडे पाहून संशयास्पद वाटल्याने शालेय मुख्याध्यापक तसेच कमिटीवर असलेले अनिल बेल यांनी महाड पोलीस ठाणे येथे फोन करून या अज्ञात इसमाची माहिती दिली.त्याने पोलीस गणवेश परिधान केला आहे अंगावर पोलीस अधिकाऱ्याचा खाकी गणवेश आहे. कमरेला लाल पट्टा कमरेला पिस्तूल लावण्याचा पाऊच, डोक्यात खाकी पी कॅप त्यावर म पो. लावलेला मनोग्राम पायात लाल बूट छातीवर ए पी मेस्त्री पोलीस उप निरीक्षक नावाची नेमप्लेट व दोन्ही खाद्यावर पोलीस उपनिरीक्षक नावाचे स्टार असा गणवेश प्रधान केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अवसरमोल, पोलीस नाईक मनिष भोईर, पोलीस नाईक अभिषेक कदम पोलीस नाईक रवींद्र पवार यांनी घटनास्थळी जाऊन तोतया पोलीस उपनिरीक्षक अनिकेत प्रदीप मेस्त्री याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात महाड पोलीस ठाण्यात गु.रजि. नं.५९/२०२३ भा. द. वि. स. कलम १७०,१७१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या भामट्याने पोलीस उप निरीक्षकाचा गणवेश परिधान करून शाळेत नक्की कां गेला होता तसेच मी पोलीस अधिकारी आहे असे सांगून इतर कोणाची फसवणूक तर केली असेल कां ?यांच पुढील तपास महाड पोलीस करीत आहेत.