पुरस्कारांच्या बाजारात…

53

पुरस्कारांच्या बाजारात…

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली

 

चल गं सखी पुरस्काराच्या बाजारात जाऊ

अन् आवडीनुसार एक,एक पुरस्कार विकत घेऊ..

 

पुरस्काराचा बाजार चांगला भरला आहे 

आजकाल तिथेच गर्दी गं दिसत आहे 

त्या गर्दीत दोघ्याही जणी सामील होऊ

अन् आवडीनुसार एक,एक पुरस्कार विकत घेऊ ..

 

आपल्यालाला मोठे व्हायचे आहे लवकर 

 प्रसिद्धीचे भुत सवार झाले आहेत आपल्यावर

त्यांच्याकडे गं तू लक्ष नकोच देवू

अन् आवडीनुसार एक,एक पुरस्कार विकत घेऊ ..

 

पुरस्काराने ओळख होते जगात 

असे बरेचजण गं दररोज‌ म्हणतात 

चल आपला स्वाभिमानही विकुन टाकू

 अन् आवडीनुसार एक,एक पुरस्कार विकत घेऊ…

 

पण सखी खरच यात समाधान मिळेल का …?

दुसरे आम्हांला कोणी काही म्हणतील का..?

लोकांचे बोलणेही विसरून जाऊ

अन् आवडीनुसार एक,एक पुरस्कार विकत घेऊ…

 

चल गं प्रस्तापितांच्या पाया पडू

त्यांनी सांगितले तसेच काम करू

स्वतःलाही गं विसरून जाऊ

अन् आवडीनुसार एक, एक पुरस्कार विकत घेऊ…

 

बाजारात अनेक दुकान थाटले आहेत 

तेथे नव नवीन पुरस्कार उपलब्ध आहेत 

बाजूच्या भाऊलाही पुरस्कार घ्यायला सांगू 

अन् आवडीनुसार एक, एक,पुरस्कार विकत घेऊ…

 

काम आपले साधविण्यासाठी आमचा वापर केले

आज तेही स्वार्थी होऊन गेले

त्यांचे आपण गुलाम बनून राहू 

अन् आवडीनुसार एक, एक पुरस्कार विकत घेऊ…

 

आपले कार्य राहोत अथवा, नको राहोत

समाज शिको अथवा नको शिको 

आपण तर आज नासमज झाले आहोत 

पुढे जाण्यासाठी वेळ आली तर 

 आपलं सर्वच विकून टाकू

अन् आवडीनुसार एक, एक पुरस्कार विकत घेऊ…