चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी मिळाला ’35 कोटी’ रुपयांचा निधी • पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निधी मंजूर • 9 कोटी रुपयातून बनणार वढा आणि छोटा नागपूर येथे पुल

चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी मिळाला '35 कोटी' रुपयांचा निधी • पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निधी मंजूर • 9 कोटी रुपयातून बनणार वढा आणि छोटा नागपूर येथे पुल

चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी मिळाला ’35 कोटी’ रुपयांचा निधी

• पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निधी मंजूर
• 9 कोटी रुपयातून बनणार वढा आणि छोटा नागपूर येथे पुल

चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी मिळाला '35 कोटी' रुपयांचा निधी • पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निधी मंजूर • 9 कोटी रुपयातून बनणार वढा आणि छोटा नागपूर येथे पुल

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 19 जुलै : मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी यादीत चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी तब्बल 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून चंद्रपूर मतदार संघातील अनेक महत्वाची विकासकामे मार्गी लागणार असून यातील 9 कोटी रुपयातून वढा – पांढरकवडा आणि छोटा नागपूर – विचोडा येथे पूलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
सोमवार 17 जुलै पासून मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली. पंधरा दिवस चालणार असलेल्या या अधिवशेनात चंद्रपूर मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याच्या दिशने आ. जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु आहे. अधिवशेनाच्या पहिल्या दिवशी प्रकाशित आलेल्या पुरवणी यादीत चंद्रपूर मतदार संघातील विविध विकासकामांसाठी 35 कोटी रुपये देण्यात आले. या निधीतील पाच कोटी रुपये वढा पांढरकवडाला जोडणाऱ्या पुलाच्या कामात लावण्यात येणार आहे. तर छोटा नागपूर ते विचोडा गावाला जोडणाऱ्या पुलासाठी चार कोटी रुपयांचा निधी खर्च केल्या जाणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वढा आणि छोटा नागपूर येथे पुरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. या पुराची पहाणी करत असतांना या ठिकाणी पुल तयार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर या कामासाठी आ. जोरगेवार यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या दोनही कामांसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तर या पुरवणी यादीतून मिळालेल्या निधीतून ताडाली – येरुर – पांढरकवडा – धानोरा – भोयगाव – गडचांदुर – जिवती मार्गासाठी व पेव्हींग ब्लॉकच्या कामासाठी 6 कोटी रुपये, घूग्घूस वळणमार्गासाठी 10 कोटी, साखरवाही-येरुर-वांढरी-एमआयडीसी-दाताडा सिमेंट कॉंक्रिट नाल्यासाठी 5 कोटी रु, उसेगाव -वढा -धानोरा -पिपरी -मार्डा रस्त्याच्या विकासकामाकरिता 1 कोटी रुपये यासह विविध कामे या निधीतून केल्या जाणार आहे. मिळालेल्या या निधीतून मतदार संघातील विकासकामांना गती मिळेल अशी आशा आ. जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केली.