माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील खांदाड आदिवासीवाडीला गोद नदीच्या वाढत्या प्रवाहाने घेरले
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-माणगांव मोर्बा रोड येथील खांदाड आदिवासी वाडी येथे सततधार कोसळणाऱ्या पावसामुळे गोद नदीला पूर आल्याने आदिवासीवाडीच्या सर्व बाजूनी पाण्याने घेरलं होत तेथील ७४ रहिवाशी यांना माणगाव पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उप निरीक्षक गायकवाड, पोलीस हवाळदार समेळ, पोलीस शिपाई डोईफोडे,साळुंखे रेस्कु टीम व अपदा मित्र यांच्या मदतीने बाहेर काढून जि.प.शाळा खांदाड येथे स्थलांतर करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे कोणतेही जीवितहानी होऊ नये या करिता आपत्कालीन व्यवस्थापक साळुंखे रेस्क्यू टीम व आपदा मित्र तैनात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे माणगांव पोलीस व नगरपंचायत, तहसीलदार, प्रांतअधिकारी, साळुंखे रेस्क्यू व आपदा मित्र यांच्या मदतीने यांनी आज खांदाड आदिवासीवाडी येथील ७४ नागरिकांना सुखरूप पाण्याच्या ओढ्यातून काढून खांदाड येथील जि. परिषद शाळेत स्थलातर केले आहे.या उत्कृष्ट कामगिरी बद्दल माणगांवमध्ये त्याचे कौतुक होत आहे.