शहरातील पूरपरिस्थितीची आमदार जोरगेवार यांनी केली पाहणी, नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी घेत मदत केंद्रात सोयी सुविधा पुरविण्याच्या केल्या सूचना

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर, 24 जुलै: शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या असून आमदार किशोर जोरगेवार यांनी या भागाची पाहणी केली. येथील नागरिकांशीही आ. जोरगेवार यांनी चर्चा केली असून घाबरण्याचे कारण नाही. काही तासात पाण्याची पातळी कमी होणार असल्याचे धीर देत सांगीतले. तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी घेत त्यांना ठेवण्यात आलेल्या मदत केंद्रात आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. 

यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील नद्या उफाळून वाहत आहे. परिणामी चंद्रपूरच्या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आता हे पाणी नागरीवस्तींमध्ये शिरले असून अनेक भागातील घरे खाली करण्यात आली आहे. यात मोहमदीया नगर, भिवापूर येथील भंगाराम प्रभाग आणि रेहमतनगर, बिलाल कॉलनी, आयशा मस्जिद, सिस्टर कॉलनी, तेलखाना हा भाग अधिक प्रभावीत झाले आहे.

दरम्यान सोमवार 24 जुलै रोजी आ. जोरगेवार यांनी या भागाची अधिका-यांसह पाहणी केली. या भागातील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. ही समाधानकारक बाब आहे. तरीही प्रशासनाने दक्षता घेण्याची गरज आहे. या भागात रेस्क्यू पथक तैनात ठेवण्यात यावे, घरातील सामान काढण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करावे, या भागात पोलिसांची तैनाती करण्यात यावी, प्रशिक्षीत बोटमॅन येथे ठेवण्यात यावे, येथील नागरिकांना ठेवण्यात आलेल्या मदत केंद्रात योग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, येथील नागरिकांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात यावी, येथे असलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जावी, पाणी साचलेल्या परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी, येथे डांसाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी नियमीत फॉगिंग करने, नागरिकांना सतर्क करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, आदी सूचना आ. जोरगेवार यांनी यावेळी संबधित अधिका-यांना केल्या.

यावेळी मनपा उपायुक्त अशोक गराटे, तहसीलदार विजयपवार, मंडळ अधिकारी वर्भे, सहायक आयुक्त सचिन माकोडे. मनपा स्वच्छता प्रमुख अमोल शेडके, स्वच्छता अधिकारी भूपेश गोटे यांच्या सह यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजित शहा, यंग चांदा ब्रिगेडचे अपल्संख्यांक शहर प्रमुख सलिम शेख, यंग चांदा ब्रिगेडचे अपल्संख्यांक विभाग युथ प्रमुख राशेद हुसेन, शिक्षण विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर, हेरमन जोसेफ, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.

चंद्रपुरात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर शहर जलमग्न झाले होते. तेव्हा पासून आ. जोरगेवार चंद्रपूरात असुन या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. अनेक भागातील पंचनामे सुरु झाले असून पंचनामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. दरम्यान मागील दोन दिवसात पाणी शिरलेल्या नागरिकांचेही नुकसान झाले आहे. या भागात पुन्हा नव्याने पंचनामे करण्याच्या सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहे. यावेळी त्यांनी घुटकाळा येथील किदवाई स्कूल आणि महात्मा फुले शाळा येथे भेट देत येथे आशयास असलेल्या नागरीकांशीही चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here