वडगाव ग्रामपंचायत येथे लवकरात लवकर कॉंक्रिटीकरण रस्ता तयार करून द्यावे ग्रामस्थांनी केली ग्रामसेवकांना मागणी…
प्रकाश नाईक
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
📲 9511655877
नंदुरबार : दि.24 जुलै 2023 रोजी ग्रामपंचायत वडगाव येथे लगन पावरा यांच्या घरापासून ते चिनकी पावरा यांच्या घरापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे-असी मागणी गाव शाखा बिरसा फायटर्स व ग्रामस्थांनी ग्रामसेवक एस.व्ही.मंडळे व सरपंच दिनेश पावरा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की वडगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतं आहेत. ग्रामपंचायत वडगाव तर्फे शासनाच्या विविध योजनेतून वडगावला सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यात आले आहेत. परंतु लगन दुलबा पावरा यांच्या घरापासून ते चिनकी गिरधर पावरा यांच्या घरापर्यंत रस्ता अद्याप बनविण्यात आला नाहीत. त्यामुळे आम्हाला दळणवळण करण्यासाठी अनेक अडचणी येतात. शिवाय सांडपाण्याची व्यवस्था न केल्यामुळे पाणी साचून आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहेत. त्यामुळे आम्हा रहिवाशांना सदर रस्त्यावरून येता जातांना आम्हाला आणि रहिवाशांना खूपच त्रास सहन करावा लागतो. सदर रस्ता लवकरात लवकरात रस्ता झाल्यास आम्हा रहिवाशांना व पादचा-यांना पायी येण्या जाण्याची,चार चाकी,दुचाकी वाहनाने येण्या जाण्याची सोय होईल व इतर अनेक अडचणी दूर होतील, म्हणून ग्रामपंचायत तर्फे लवकरात लवकर रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करून तयार करण्यात यावे अशी मागणी गाव शाखा बिरसा फायटर्स व ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी उपस्थित जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जलिंदर पावरा,गाव शाखा उपाध्यक्ष राजू पावरा,गाव शाखा संपर्क प्रमुख बिरबल पावरा,गाव शाखा सल्लागार पवन पावरा, सदस्य राहुल पावरा, रमेश पावरा, विजय सोनवणे आदी उपस्थित होते.