जागतिक बौध्दधम्म परिषद व कर्मचारी/अधिकारी कल्याण संघ, मंत्रालय, मुंबई, जिल्हा गोंदियाच्या वतिने सत्कार समारोह

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी 

राजेन्द्र मेश्राम 

मो: 9420513193

 23/07/2023 रोजी डा बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मरारटोली, गोंदिया येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. सर्वात प्रथम महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परम पुज्य डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दिपप्रज्वलित करून व बुध्द वंदना ग्रहण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. जागतिक बौध्दधम्म परिषद जिल्हा गोंदियाचे दिवंगत हरीप्रकाशजी नंदेश्वर यांना दोन मिनिटे मौन राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

नंतर आयु अमित चंद्रभानजी ऊंदिरवाडे हा UPSC परिक्षा ऊतिर्ण झाल्याबद्दल त्यांच्या आई-वडिलासोबत, मा डा मनोज राऊत साहेब सेवा निवृत्त झाल्याबद्दल, मा एम एन नंदेश्वर यांची वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर पदोन्नति व जिल्हाध्यक्ष, कर्मचारी/अधिकारी कल्याण संघ, मंत्रालय, मुंबई, जिल्हा शाखा गोंदिया या पदावर नियुक्ति झाल्याबद्दल तसेच मा एच आर लाडे सर यांची नियुक्ति जनरल सेक्रेटरी, कर्मचारी/अधिकारी कल्याण संघ, मंत्रालय, मुंबई, महाराष्ट्र या पदावर झाल्याबद्दल वरील सर्वांचा त्यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह भेट देऊन सापत्निक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा एच आर लाडे सर, तर प्रमुख अतिथि मा ग गो पंचभाई साहेब, सेवा निवृत्त सहसचिव, उद्योग व सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई हे होते. तसेच मा करूणा कामत या सेवा निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सुध्दा व मा भिमरावजी टेंभुर्णे, जिल्हाध्यक्ष, कर्मचारी/ अधिकारी कल्याण संघ, मंत्रालय, मुंबई, जिल्हा शाखा भंडारा यांना राज्यस्तरीय प्रथम छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळाल्यामुळे, त्यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह भेट देऊन सापत्निक सत्कार करण्यात आला. तसेच मा ग गो पंचभाई साहेब, यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

मंचावर मा डा स्वप्निल बन्सोड साहेब, मा डा राजेन्द्र वैद्य साहेब, मा डा टेंभुर्णीकर साहेब, मा संध्या गजभिये, अध्यक्षा, जागतिक बौध्दधम्म परिषद जि गोंदिया विराजमान होते.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन आयु माधुरी टेंभुर्णीकर यांनी केले व उत्तमरित्या प्रस्तावना आयु आभा मेश्राम यांनी मांडल्या व सुंदर आभार प्रदर्शन आयु वैशाली मेश्राम यांनी मानले.

कार्यक्रमास प्रामुख्याने मा अनिरुद्ध मडामेजी, जिल्हाध्यक्ष, जागतिक बौध्दधम्म परिषद जि गोंदिया, डा जे आर राऊत साहेब, अशोक कांबळेजी, एच जी टेंभेकरजी, महेन्द्र टेंभेकरजी, एच बी नंदेश्वरजी, गणेश गणविरजी, प्रविण गजभियेजी, डि एम वासनिकजी, उमाशंकर मडावी साहेब, सि टी ऊंदिरवाडेजी, मंगलाजी नंदेश्वर, अनिल सुखदेवेजी, निलु महंतीजी, अंजू वैद्यजी, मंगलाजी गेडाम, पौर्णिमा लाडे, शिवमालाजी मडामे, शोभनाजी राऊत, वैशाली ऊंदिरवाडे, कल्पना जांभुळकर, ताराबाई राऊत, वंचिता बन्सोडजी, लताजी मडावी, वर्षाजी शेंडे, रेखाजी चौरे, छायाजी टेंभुर्णे, प्राचार्य पटेलजी मॅडम भंडारा, व बहुसंख्येने षरिषदचे व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी/सदस्यगण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वेकरीता, आयु संध्या गजभिये, मंगला नंदेश्वर, आभा मेश्राम, माधुरी टेंभुर्णीकर, एम एन नंदेश्वर RFO, अनिरुद्ध मडामे, महेन्द्र टेंभेकर ईत्यादिनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here