वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्ड 2023 या गुणगौरव पुरस्कारांने पत्रकार दशरथ सुरडकर सन्मानित…
मनोज एल खोब्रागडे
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मो: 8208166961
सिल्लोड : – पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पत्रकार दशरथ सुरडकर यांना “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनेशनल अवार्ड 2023” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल आहे. त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा प्रमुख मान्यवरांच्या वतीने गुणगौरव सत्कार करण्यात आला आहे.
श्रीरामपूर येथील नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातवर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशनच्या वतीने हा आंतरराष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला.
– पत्रकार दशरथ सुरडकर यांची संस्थेच्या राज्य प्रचार विभाग प्रमुखपदी नियुक्ती
यावेळी डब्ल्यूसीपीएचे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट प्रा.नरसिंहा मूर्ति,डब्ल्यूसीपीएचे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट वरिष्ठ उपाध्यक्ष तथा जेष्ठ गांधीवादी नेते प्रा. ई.पी मेनन, श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत, महाराष्ट्र राज्य संपादक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलथे,डब्ल्यूसीपीए अमेरिकेचे सिनियर बोर्ड मेंबर प्रा. रिचर्ड शार्प, डब्ल्यूसीपीएच्या दिल्ली चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. राकेश छोकर, श्रीरामपूर रेल्वे पोलिस प्रमुख विजय शिंदे, प्रवरा कम्युनिटी रेडिओच्या स्टेशन डायरेक्टर गायत्री म्हस्के,डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे
यांच्या हस्ते हा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना देण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील मादणी या छोट्याशा गावातील प्रख्यात कवी व ज्येष्ठ पत्रकार दैनिक माझा मराठवाडा व साप्ताहिक आपले ज्ञानपंख वृत्तपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.वैश्विक शांतता आणि समृद्धता या प्रमुख मुद्यांवर 146 देशांमधे या संस्थेचे कार्य पसरले आहे..ग्लेन मार्टिन हे या संस्थेचे अध्यक्ष असून कॅलिफोर्निया येथे या संस्थेचे मुख्यालय आहे.
भारतामधील दिल्ली, बेंगलुरु येथील कार्यालयांमधून विविध उपस्थित मान्यवर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.
संस्थेचे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ दत्ताजी विघावे यांनी विशेष प्रयत्न व शिफारस करून पत्रकार दशरथ सुरडकर यांची राज्य प्रचार विभाग प्रमुख निवड केली आहे.एकीकडे पुरस्कार व दुसरीकडे निवड झाल्याबाबत पत्रकार सुरडकर यांच सर्वत्र तोंडभरून कौतुक केलें जात आहे…..