विद्यार्थीनीची गळफास लावून आत्महत्या
अश्विन गोडबोले
चंद्रपूर ब्युरो चीफ
📱 8830857351
चंद्रपूर, 25 जुलै: कोठारी येथील दहाव्या वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थीनीने स्वत:च्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार, 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कोठारी येथे घडली. आसावरी अनिल चौधरी (15) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. आसावरी चौधरी ही येथील जनता विद्यालयात दहावीत शिकत होती. आई धान रोवणीला गेली, तर वडील आपल्या सलूनमध्ये गेले होते. दरम्यान, वडील जेवण करण्यासाठी घरी आले असता, त्यांना आसावरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.