२६ जुलै २००५ चा काळा दिवस…महाड तालुक्यातील दासगांव गावात झाला होता असा भयानक अपघात
सचिन पवार
कोकण ब्युरो चीफ
मो: 8080092301
महाड :-महाड मधील दासगांव गावावर 26 जुलै 2005 या दिवसी भोई समाजातील अनेक निष्पाप जीव भूमिलीन झाले त्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी आज दासगांव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील दासगांव गावात मोठी दुर्घटना घडली होती अनेक घरे दरडीखाली जमीनदोस्त झाली आणि होत्याचे नव्हते झाले समाजातील लोक मृत्यूमुखी पडले यामध्ये काहींचे संपूर्ण कुटुंबच कुटूंब ढिगाऱ्याखाली गेले तर कुणाचे वडील तर कुणाची आई, भाऊ बहीण पत्नी तर कुणाचे पोटचे बाळ या दुर्घटनेमध्ये किती तरी निष्पाप लोकांचे जीव गेले होते.
दासगांव येथे घडलेल्या या दुर्घटनेला आज 18 वर्ष पूर्ण झाले आहे. आभाळा एवढे दुःख मनात घेऊन प्रत्येक दिवस त्या भयानक डोगराकडे एकटक पाहून अश्रूच्या धारा प्रत्येक गावकर्यांनवर येत असतात देवाकडे एकच मागणी की अशा घटना कुठेही कधी होऊ नये असे ईश्वराकडे मागत असतात आजच या घटनेला 18 वर्ष पूर्ण झाली म्हणून समस्त गावकरी त्या निष्पाप जीवांना श्रद्धांजली वाहण्याकरिता एकत्र येऊन विनम्र अभिवादन केले…..