गावातील अवैध दारूविक्रीला कंटाळत महिलांनी महिलेकडून जप्त केली दारू.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
नागपुर:- भिवापूर तालूक्यातील गावातील अवैध दारूविक्रीला कंटाळत अखेरीस स्वत: महिलांनी पुढाकार घेत अवैध दारूविक्री करना-या विरुध्द एल्गार पुकारला आणी अवैध दारूविक्री करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले.

भिवापूर येथील महिलेसह अमन देवानंद बाकडे वय २० वर्ष रा. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील नागतरोली- नेरी- सावरगाव मार्गावर भिवापूर येथील महिला अवैध दारूविक्री करते. त्यामुळे या गावातील महिला संतापल्या आहेत. याबाबत त्यांनी गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगत कारवाईची विनंती केली. मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे या अवैध धंद्याला अभय कुणाचे, असा शंकेचा प्रश्न उपस्थित होताच गावातील महिलांनीच खुद्द कंबर कसली. दरम्यान, बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास महिलांनी घटनास्थळ गाठत, दारूविक्रेत्या महिलेला दारूसह ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या सुपूर्द केले. तिच्याकडून ८१० रुपये किमतीच्या १८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. यात ललिता तलमले, शोभा धारणे, मंगला तुमडाम, सिंधू चौधरी, भूमिता धारणे, वंदना तलमले, सरिता गजभे, सुनंदा नैताम, सुभाष साखरकर, मोहित तलमले आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here