वाण्याविहिर सातपुडा कनिष्ठ कला महाविद्यालयात फिरत्या शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती दिली…
प्रकाश नाईक,
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
मो. 📲 9511655877
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील श्री सातपूडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात फिरत्या शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती देण्यात आली.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यांच्या व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार तसेच गटसाधन केंद्र अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने वस्तू संग्रहालयाच्या शतक पूर्ती निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध जतन केलेल्या वस्तूंचे माहिती व्हावी यासाठी फिरते वस्तू संग्रहालयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती देण्यात येत आहे.तुम्ही संग्रहालयात येऊ शकत नसाल तर संग्रहालय तुमच्याकडे येईल या तत्वावर हे फिरते वस्तू संग्रहालय अनेक राज्यांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या ठिकाणी जावून माहिती देत आहेत. डायटचे अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात याचे नियोजन सुरू आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अक्कलकुवा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लालसिंग पावरा, प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी मंगेश निकुंभ, प्राचार्य एच.के.पाडवी, उपमुख्याध्यापक जे. एस. झाल्टे आदी मान्यवर उपस्थित होते.मुंबई येथून आलेले चिन्मय गावडे,लोकायत हलकर,गौरव जाधव,देवेश पाले,ओंकार डोंगरकर,अमर पाटील, गटसाधन केंद्रांचे समन्वयक प्रविण पाटील यांनी विद्यार्थ्यांना याबाबत सखोल माहिती आणि मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिन्मय गावडे तर सूत्रसंचालन पंकज मराठे यांनी केले.