सिन्नर वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ट्रामा युनिटचा दर्जा द्या – सत्यजीत तांबे

56

सिन्नर वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ट्रामा युनिटचा दर्जा द्या – सत्यजीत तांबे

मीडियावार्ता 

मुंबई  प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या वावी येथील प्राथमिक केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, तेथे ट्रॉमा युनिट बनवावे, रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत केली. ते पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलत होते. वावी येथील प्राथमिक आरोग्य त्यामुळे अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळू शकतील, असे ते म्हणाले. 

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे, तसेच मुंबईवरून शिर्डीला जाणारे भाविक वावी मार्गे जातात. चौपदरी रस्ता झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी, या भागात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे खूप गरजेचे आहे.

• ग्रामीण रुग्णालय दर्जा, रुग्णवाहिका उपलब्ध केल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळतील, आ. सत्यजीत तांबे यांनी वेधले सरकारचे लक्ष

वावी येथे रस्त्याजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राला ट्रॉमा युनिट म्हणून सुधारित करून ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा दिल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळणे शक्य होईल, असे आ. तांबे म्हणाले. सरकारने याची तत्काळ गांभीर्याने दखल घेत वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ट्रामा युनिटच्या दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.