सरदार पटेल महाविद्यालयातील खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेत निवड
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 2 ऑगस्ट: येथील सरदार पटेल महाविद्यालयातील धम्मज्योती रायपुरे हीची तामिलनाडू राज्यातील नामाकल जिल्ह्यामधील त्रिरुचेनगोडे येथे सुरु असलेल्या राष्ट्रिय टग-ऑफ-वार स्पर्धेकरिता निवड झालेली आहे.
21 ते 23 जुलै 2023 रोजी आयोजित 36 व्या सिनिअर टग-ऑफ-वार स्पर्धेकरिता महाराष्ट्र टग-ऑफ-वार असोसिएशनने मुलींचा संघ जाहिर केला. यात 36 व्या सिनिअर टग-ऑफ-वार स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात धम्मज्योति रायपुरे हिची निवड झालेली आहे. विशेष म्हणजे, धम्मज्योति रायपुरे हीने चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली राष्ट्रिय टग-ऑफ-वार खेळाडू होण्याचा मान मिळवला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या खेळाडूला प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालय येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. विक्की पेटकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधा पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी खेळाडूचे अभिनंदन केले.