भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला हृदयविकाराचा तीव्र झटका.

कोलकाता:- भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI चा अध्यक्ष सौरव गांगुलीला छातीत दुखू लागल्याने शनिवारी तातडीने कोलकाता येथील वूडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सौरभ गांगुलीला कोलकाता येथील वुडलॅण्ड हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आणि त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. आता सौरभ गांगुलीची प्रकृती स्थिर असून पुढील 48 तास त्याला मेडिकल टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती वुडलँण्ड हॉस्पिटलचे डॉ. सरोज मोंडल यांनी यावेळी दिली. सौरभ गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी जगभरातील चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

सौरभ गांगुली शनिवारी सकाळी जिममध्ये वर्पआऊट करीत होता. यावेळी त्याच्या डोळय़ांसमोर अंधारी आली. त्यानंतर कुटुंबीयांनी अकरा वाजता सौरभ गांगुलीला वुडलॅण्ड हॉस्पीटलमध्ये नेले.

सौरभ गांगुलीच्या हृदयात तीन ब्लॉकेज होते. त्याच्यावर अँजियोप्लास्टी करुन उपचार करण्यात आले आहेत. आता त्याची प्रकृती स्थिर असून कुठलाही धोका नाही आहे. तो बोलतही आहे.

मेडिकल टीमची आणखी एक बैठक होणार असून यामध्ये पुढील प्रकियेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

सौरभ गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देशातूनच नव्हे, जगभरातील चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग, माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग, अनिल पुंबळे, माजी फलंदाज गौतम गंभीर यांच्यासह मोहम्मद शमी, शिखर धवन या सध्याच्या खेळाडूंनीही सौरभची प्रकृती ठणठणीत होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

तीन ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. वुडलँड्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर आफताब खान यांनी सांगितले, की सौरव गांगुली यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर पुढील 24 तास लक्ष ठेवण्यात येईल. तो पूर्णपणे शुद्धीवर आहे. त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज होते. वुडलँड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रूपाली बसू आणि डॉ. सरोज मंडल यांनी सांगितले, की त्यांच्या हृदयात अनेक ब्लॉकेज होते. जे ‘क्रिटिकल’ होते. त्यांना स्टेंट लावण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here