संभाजीनगर, शहादा येथे काल 9 ऑगस्ट आदिवासी गौरव दिनानिमित्त घेण्यात आली जाहीर सभा…

प्रकाश नाईक

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी

मो. नं. 📲 951165587

नंदुरबार : बोधी वृक्ष परिसर, विपश्यना हॉल मध्ये 9 ऑगस्ट आदिवासी मूलनिवासी गौरव दिनानिमित्त शहादा तालुक्यातील आदिवासी संघटनांचे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली, या बैठकीत तालुका व नंदुरबार जिल्हा स्तरावर मणिपूर येथे आदिवासी जनसमुदाय व महिलांवर तीन महिन्यापासून अमानुष अत्याचार, महिलांवर बलात्कार होत आहेत, त्यामुळे त्याच्या निषेधार्थ यावर्षी 9 ऑगस्ट आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रम कुठल्याही प्रकारे संस्कृतिक उपक्रम न राबवता मणिपूर शासनाच्या निषेध म्हणून व तेथील जनतेला न्याय मिळावा यासाठी जिल्हास्तरावर नंदुरबार येथे आक्रोश मोर्चाचे तयारी नामदेव पटले यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन करण्यात आले आहे.

यापवेळी आदिवासी सामाजिक संघटनांचे, प्रतिनिधी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले. व बैठकीची सुरुवातीला झेलसिंग पावरा यांनी प्रस्तावना केली, आणि वनिताताई पटले माझी पं.स. सभापती कॉ. वाहरू सोनवणे,डॉ, सुरेश नाईक, सुरेश मोरे , राजू सोनवणे, गंगाराम राहासे रतिलाल शेंमळे, आदींनी मनोगत व्यक्त केले, बैठकीत सूत्रसंचालन चुनीलाल ब्राह्मणे यांनी केले, आभार सुभाष नाईक यांनी मानले या बैठकीसाठी योगेश मोगरे आकाश मोरे कार्तिक नाईक गोपाल ठाकरे विशाल बेहड़े दिनेश मोगरे राहुल पवार दिपक मोगरे प्रभु नाईक आणि भिलवंशग्रुपचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here