पाडली, बोरकीपाडा ग्रामस्थांचे अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध निवेदन

51

धडगाव तालुक्यातील पाडली, बोरकीपाडा ग्रामस्थांचे अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन…

प्रकाश नाईक

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी

मो📲 9511655877

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील पाडली बोरकीपाडा येथील अंगणवाडी कार्यकर्त्या दुर्गा फुलसिंग वसावे ह्या दररोज अंगणवाडीत येत नसून आलेला पूरक पोषण आहार हा बालकांना तसेच किशोरवयीन मुलींना वाटप करत नाही तसेच बालकांना शिकवत सुद्धा नाही पूरक पोषण आहार हा स्वतःच्या घरी ठेवून स्वतः वापरत आहे

पाडली बोरकीपाडा ग्रामस्थानी अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सुपरवाईझरांना निलंबीत करा,मिऱ्याम वळवी यांची मागणी…

यासंबंधी ग्रामस्थांनी विचारणा केली असता उलट उत्तरे देतात यासंबंधी श्रीम. मिऱ्याम वळवी व ग्रामस्थांनी अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती. चौधरी मॅडम यांना कळविले आहे परंतु काही सुधारणा झाली नाही उलट अंगणवाडी सुपरवायझर ह्या त्यांना पाठीशी घालत आहे या विषयी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना कळविण्यात आले आहे परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून आज रोजी पाडली बोरकी पाडा येथील ग्रामस्थ आणि मिऱ्याम वळवी यांनी अंगणवाडी कार्यकर्ती व अंगणवाडी सुपरवायझर त्यांना निलंबित करण्याची मागणी करत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन वैयक्तिक लक्ष घालण्यासंबंधी निवेदन देण्यात आले आहेत.