मतभेद बाजूला सारून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : संजय शिरोडकर

लक्ष्मण सोनावणे 

इगतपुरी प्रतिनिधी: सर्वांनी मतभेद बाजूला सारून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागावे. कोण गेले कोण राहिले त्याचा विचार करू नका आम्ही चांगल्या चांगल्याना पाणी पाजू शकतो ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. घोडदौड सुरू झाली असून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेत पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून बांधनी करायची आहे. कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे असे आवाहन इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे संपर्कप्रमुख संजय शिरोडकर यांनी केले.

गोंदे दुमाला येथे उद्धव ठाकरे शिवसेना गटाची आढावा बैठक पार पडली याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री शिरोडकर बोलत होते. यावेळी लोकसभा विधानसभा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, पारदर्शक काम करावे असे जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर यांनी सांगितले.

गोंदे दुमाला येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, तालुका प्रमुख भगवान आडॊळे,माजी तालुका प्रमुख राजाभाऊ नाठे,जेष्ठ नेते कचरू पाटील डुकरे, महिला तालुका प्रमुख अलका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, नंदलाल भागडे, रमेश धांडे, केरू देवकर, माजी उपसभापती विठल लंगडे, हरिदास लोहकरे, माजी सभापती सोमनाथ जोशी, हरीभाऊ वाजे, बाजार समितीचे संचालक अर्जुन भोर, देवराम म्हसने, कावजी ठाकरे, अशोक चव्हाण, रमेश धांडे, हनुमंता गायकवाड, गणेश काळे, उपसरपंच स्वाती कडू, मोहन भोर, खंडेराव झनकर, नवनाथ बोंडे, अंबादास धोंगडे, संपत मुसळे, भरत भटाटे, शिवाजी काळे, सुदाम भोसले,पोपट लहामगे, संदीप नाठे, चेअरमन विष्णू पाटील धोंगडे, संदीप पवार, सूरज कोकणे, रोहिदास गायकर, संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराम म्हसणे यांनी केले.

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रत्यक्षात लोकांच्या मनामनात पोहोचवणारी शिवसेना सत्य आणि वास्तव आहे. सामान्य शिवसैनिक ह्यामुळेच उद्धव साहेबांच्या सोबत असल्याचे दिसून येते. कुणाच्या जाण्याने आमच्यावर कवडीमात्र फरक पडत नाही. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक असून, सर्वांना एकत्र घेऊन आम्ही जोमाने काम करण्यास कटिबद्ध आहोत. पूर्वीचे वैभव टिकून ठेऊ पक्षाला उभारी देण्याचे काम शिवसैनिकांनी करावे. आगामी काळात ताकद दाखवून देऊ – निवृत्ती पाटील जाधव, उपजिल्हाप्रमुख शिवसेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here