अक्कलकुवा येथे 9 ऑगस्ट आदिवासी गौरव दिना विषयी सभा घेण्यात आली..

89

अक्कलकुवा येथे 9 ऑगस्ट आदिवासी गौरव दिना विषयी सभा घेण्यात आली..

प्रकाश नाईक

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी

मो:📲 9511655877

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे आज दिनांक. 06 ऑगस्ट 2023 रोजी 9 आॅगस्ट आदिवासी गौरव दिना विषयी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी यांनी 9 आॅगस्ट विश्व आदिवासी गौरव दिना विषयी संदेश देतांना असे म्हटले आहे की,आपण दर वर्षी प्रत्येक तालुक्यात व गावात 9 ऑगस्ट साजरा करत होतो,पण या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात अथवा गावात 9 ऑगस्ट साजरा न करता आपण सगळे एकत्र येऊन नंदुरबार येथे 9 आॅगस्ट या दिवशी धडक मोर्चा काढणार आहोत. त्यामुळे या मोर्चात जास्तीत जास्त आदिवासी बांधवानी या धडक मोर्चात हजर राहायचे आहे.

नुकतेच मणिपुर राज्यात जी घटना घडली ती अत्यंत दु:खाची निंदनीय अशी घटना आपल्या आदिवासी समाजावर घडली आहेत. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी नंदुरबार या ठिकाणी आपण एकत्र जमणार आहोत. तरी आपल्या गावात जे तुर वाद्यं आहेत, ते सोबत आणायचे आहेत. असे आ. आमश्या पाडवी यांनी या सभेत नागरिकांना सांगितले. आणि जय आदिवासी ” जय बिरसा ” अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

यावेळी विधान परिषेदचे आ. आमश्या पाडवी व अक्कलकुवा तालुक्यातील इतर सामाजिक कार्यकर्ते, आणि नेते उपस्थित होते.