आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने वस्ती परिवर्तन आणि प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन…

66

आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने वस्ती परिवर्तन आणि प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

मीडिया वार्ता

मुंबई प्रतिनिधी

आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने वस्ती परिवर्तन आणि प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सालू डिसोझा चाळ, (हाफ्सी आणि चर्चजवळ), टागोर नगर, विक्रोळी पूर्व येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात अध्यक्ष मा. विद्याताई सरमळकर यांच्या उपस्तितीत आणि संचालिका संगीता मर्गज, स्थानिक मंडळाचे सदस्य बाळा परब, सुरेश कुवार, राजा मदलानी, सौरभ मोरे, आनंद पाटील, दर्शना मोरे, शोभा फर्नांडिस यांच्या हस्ते 10वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

जवळच रेल्वे ट्रॅक असल्याने दिवस, रात्र धावत्या ट्रेनचे, लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या ट्रेन मोठा आवाज, हॉर्न अशा वातावरणात ही १० वी, १२ वी या बोर्डात मेहनत करून ८३%, ७९% गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत, अशा सर्वच विद्यार्थ्यांचे खुप कौतुक करावे वाटले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विद्या सरमळकर म्हणाल्या की, युवा पिढी उच्च शिक्षित असेल तर देशाचे उज्ज्वल भवितव्य निश्चित आहे, या विद्यार्थ्यांना समुपदेशन व शैक्षणिक सहकार्य करण्यास प्रतिष्ठान सदैव अग्रस्थानी असेल.

कार्यक्रम नियोजन पूजा कांबळे, सानिका लोंढे, प्रणाली जाधव, दिपाली पिंपळे, सरिता हारळे, सोनी कहर, राजेश्री परब, हाजरा शेख, शोभा ऊचे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ मोरे यांनी केले.