मारुळ येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात, असे केले प्रतिमा पुजन…
सुपडू संदानशिव
यावल तालुका प्रतिनिधी
📱9561200938
यावल – तालुक्यातील मारुळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुळ चे सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष असद सैय्यद हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महानायक, क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्रपण सरपंच असद सैय्यद उपसरपंच पती सलामत अली सय्यद व ग्रामविकास अधिकारी आर टी बाविस्कर यांचे करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मारूळ चे पोलीस पाटील नरेश मासोळे ग्रामविकास अधिकारी आर टी बाविस्कर उपसरपंच सलामत अली सैय्यद ग्रामपंचायत सदस्य तथा कॉग्रेस पक्षाचे बुथ प्रमुख मतिउर रहेमान पिरजादे,मुर्तेजाअली सैय्यद,सिताराम पाटील,गफ्फार तडवी, झिपरु तडवी, अमिर तडवी, अर्षद तडवी,ग्रा.रो.संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे, निळे वादळ सामाजिक संघटनेच्या लक्ष्मीबाई मेढे इत्यादी होते.
महानायक बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर बाळासाहेब तायडे व झिपरू तडवी यांनी प्रकाश टाकुन मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास आदिवासी सामाजिक कार्यकर्ते रुबाब तडवी, युवराज इंगळे,हिफाजत तडवी, शब्बीर तडवी, आमिन तडवी, इत्यादीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तायडे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत कारकुन परवेज सैय्यद यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिपाई सलिम सैय्यद, शफिक फारुकी, अखलाक फारुकी यांचे सहकार्य लाभले