वेकोलीच्या ओव्हर बर्डनची चोरी करणाऱ्या सिएसटीपीएस च्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा – राजेश बेले
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 12 ऑगस्ट
चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र कॉलनी परिसरात होत असलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे आदित्य कन्स्ट्रक्शन कंपनीला काळया यादीत टाकून झालेल्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी. चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र कॉलनी परिसरात कंपाऊंड भिंतीच्या कामामध्ये नित्कृष्ट दर्जाची सामुग्री वापरण्यात येत असल्यामुळे निरी नागपुर व VNIT शासकीय अभियांत्रिकी विद्यालय यांच्या मार्फत कामाची व संबंधित अधिकाऱ्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. अशी मागणी मागणी. संजिवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली.
वेकोलीच्या अधिकाऱ्याने दिले कारवाईचे आश्वासन
चंद्रपुर वेस्टर्न कोलफिल्डस लिमीटेड खेरगावला लागून असलेल्या ओव्हर बर्डन चोरी करुन चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी वापरत असून याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच वापरण्यात आलेली सामुग्री जप्त करण्यात यावी. अशीही मागणी यावेळी राजेश बेले यांच्यातर्फे करण्यात आली.
चंद्रपुर महाऔष्णीक विद्युत केंद्राच्या कॉलनी परिसरात वाघ व इतर हिंस्र वन्यप्राण्यांच्या नेहमीच वावर असतो. अप्रिय घटना टाळण्यासाठी महाऔष्णिक केंद्रातर्फे विविध उपाययोजना केल्या जातात त्यात काटेरी तारेचे कुंपण, भिंतीच्या कामामध्ये नित्कृष्ठ दर्जाच्या सामग्रीचा वापर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येते. कुंपणाच्या भिंतीचे काँक्रिट पिल्लर नियमाप्रमाणे खोदकाम करून काँक्रीट पिल्लर घेणे बंधनकारक असुन सुध्दा खोलाई 2 फुट व रुंदी 4×4 इतकीच घेण्यात आल्याचे पाहणीत निदर्शनास आले. तसेच कुंपण भिंतींचे काँक्रीट पिल्लर, कांक्रीट हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसले. काँक्रीट RCC मसाला बनविते वेळी वापरण्यात आलेली रेती, गिट्टी, सिमेंट मानकाप्रमाणे वापरण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. कंपाऊंड भिंतीच्या दगडांची जुडाई करतेवेळी वेकोलीच्या ओव्हर बर्डनची माती वापरण्यात येत आहे. मानकाप्रमाणे सिमेंटचा वापर खुप मोठया प्रमाणात कमी करण्यात आल्याचे निर्देशनास येते, काटेरी तार संरक्षण भिंतीवरती वापरण्यात येत असलेला तारांचा गेज कमी असल्याचे दिसुन येते.