लोहिया विद्यालय सौंदड़ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून संपन्न.
टी.बी.सातकर गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
सौंदड़:- सौंदड़ येथिल लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,रामदेवबाबा अध्यापक विद्यालय ,जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेंट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल,सौन्दड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी मा.अतिथींनी माता सरस्वती ,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जगदीश लोहिया-संस्थापक/ संस्थाध्यक्ष-लोहिया शिक्षण संस्था, सौन्दड, प्रमुख अतिथी सचिन वांगडे पोलीस निरीक्षक,पो. स्टेशन डुग्गीपार, गायत्रीताई इरले सरपंच सौन्दड, संजय हटकर सहाय्यक सरकारी अभियोक्ता, आनंदराव घाटबांधे संस्था उपाध्यक्ष, पंकज लोहिया-संस्था सदस्य, अनिल दीक्षित, शमिम अहमद, मंजुताई डोंगरवार माजी सदस्य,पं.स.सदस्य, नंदकिशोर डोंगरावर अध्यक्ष, माळी समाज तसेच सचिव नारायण सावरकर. मिनाक्षीताई विठ्ठले व अनिताताई उपरिकर ग्रा.पं. सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य मधुसूदन अग्रवाल गुलाबचंद चिखलोंडे मुख्याध्यापक मनोज शिंदे व पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया, संस्थापक-संस्थाध्यक्ष यांनी “सावित्रीबाईंच्या जीवनावरून समाजात अन्याय व अत्याचार सहन करून समाजापयोगी कार्य करणारेच आदर्श समाज निर्माण करतात हे दिसून येते.” असे मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी सचिन वांगडे पोलिस निरीक्षक यांनी, ”मुलींनी सावित्रीबाईप्रमाणे खंबीर राहून समाजातील समस्यांना तोंड देत जीवन जगावे” असे मोलाचे मार्गदर्शन केले. सरपंच गायत्रीताई इरले, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे तसेच सौ. मंजुताई डोंगरावर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंची भूमिका वटवून तसेच गीत व भाषणांतून सावित्रीबाईंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले यांची जयंती ”महिला शिक्षण दिन” म्हणून घोषित केल्याबद्दल त्यांच्या जयंती पर्वावर लोहिया शिक्षण संस्था तसेच संस्थेअंतर्गत सर्व विद्यालयांमार्फत शासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. कार्यक्रमात कोविड-19 च्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेशी संबंधित समित्यांचे पदाधिकारी व सदस्यगण , गावकरी,पालक,विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कु.यु.बी.डोये यांनी केले तर आभार प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे यांनी मानले. ‘वंदेमातरम’या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.