माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जळगाव यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

56

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जळगाव यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

विशाल सुरवाडे

जळगाव ब्युरो चीफ

मो: 9595329191

जळगाव – दि.15 ऑगस्ट- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.त्या वेळी उपोषण करता त्यांनी सांगितले की,सुप्रीम कामगारांची सहकारी पतसंस्थाच्या बेकायदेशीर, अनियमितपणे ताब्यात घेतलेले व सदर पतसंस्थेच्या अनेक अपहार व भ्रष्टाचारा संदर्भात मागील तीन वर्षापासून पाठपुरावा करून देखील संबंधीत जबाबदार पदाधिकारी यांनी अंतीम कार्यवाहीस्तव प्रकरण नस्तीबंद केली नाही. सदर प्रकरणात मा. सहकार आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने ८९ च्या चौकशी अंती अहवालात भ्रष्टाचार निष्पन्न झालेला आहे. तसेच पुनश्च आयुक्त यांच्या कलम ६९ (४) व (५) च्या निर्देश देऊन अहवालातील उणीवांची पूर्तता व लेखापरीक्षण अहवालाची छाननी करून अंतीम कार्यवाहीने अहवाल आयुक्तांनी आदेश असतांना संबंधीत जबाबदार कार्यालयातील पदाधिकारी व अधिकृत अधिकारी (प्रशासक) श्री. राहुल कांबळे यांन त्यांनी निमून दिलेल्या कर्तव्याचे पालन आजतागात न केल्याने त्यांच्या विरुद्ध मा. जिल्हाधिकारी साहेबांना दिनांक ०७.०८.२०१३ रोजी त्यांना कर्तव्यात कसूर संदर्भात आदेश व्हावे अन्यथा त्यांचे विरूद्ध व सदर प्रकरणाच्या संबंधीत जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांच्या विरुद्ध मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या दालनात पॅन्डमस् रिट दाखल का करू नये? असा इशारा त्यांनी दिलेला आहे.

लोकशाहीत जर असे प्रशासनाकडून दोन-तीन वर्षा पर्यंत नागरिकांना न्याय न मिळता भ्रष्टाचाराला क्षय देऊन प्रशासन पोरखेळ खेळत असेल प्रशासन नावाचे दुकान बंद करू नागरिकांना न्यायासाठी सरळ कोर्टातून न्याय नागरिकांना मिळेल असे स्पष्ट फलक लावावे असा उपोषणकर्ता श्री गुणवंतराव जयंतराव सोनवणे, चोपडा तालुका उपाध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी आहे. 

उपोषणकर्त्यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जळगाव सर्व पदाधिकारी उपस्थित होते.