भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित.

58

भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित.

गुणवंत कांबळे प्रतिनिधी

मुंबई:- १ जानेवारी १८१८ रोजी भिमा कोरेगाव विजयी दिन समतेच्या व न्यायाच्या युद्धातील महापराक्रमी शूरवीरांना व त्यांच्या शौर्याला मानवंदना आणि नववर्षाभिनंदन नवीन १ जानेवारी २०२१ वर्षाच्या निमित्ताने आदर्श स्पोर्ट्स क्लब (सायन) यांच्या वतीने लहान मुले, महिलांसाठी आणि सर्व पुरुषांसाठी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली.

या क्रिकेट स्पर्धेत सर्व मुले, महिला व पुरुष वर्गाने सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.तसेच पुरुष गटात विजेता संघ फायटर इलेव्हन आणि उपविजेता संघ गँगस्टार इलेव्हन या संघाना शौर्यदिन चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच लहान मुलं आणि महिलांच्या क्रिकेट मॅच खेळविण्यात आल्या.व त्यांना ही शौर्यदिन सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या दिवसाचे औचित्य साधून सर्वानी आनंदित वातावरण आणि जल्लोष साजरा करण्यात आला.आयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजित कार्यक्रमाचे चांगलेच कौतुक ,उत्तम उल्लेखनिय कामाचे कार्यकत्यांचे खेळाडूनी आभार व्यक्त केले. क्रिकेट बघण्यासाठी बहुसंख्येने लोकांनी आपली उपस्थिती दाखवली होती.

बोद्धजन पंचायत शाखा क्रमांक ३९२,आदर्श सामाजिक प्रतिष्ठान,तक्षशिला महिला मंडळ यांचे कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते. वसाहतील रहिवासी यांचे कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आदर्श स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने नरेश कांबळे यांनी आभार व्यक्त केले. सुबोध सकपाळ, सुशील कदम,दिनेश मोरे, संदीप सोनावणे, तुकेश यादव, गणेश (चार्ली) कांबळे, मनिष कांबळे, मयूर कांबळे, सुमेध सकपाळ, पिलाजी कांबळे, प्रतिक कांबळे, विशाल सकपाळ, प्रविण बनकर, अशोक सोनावणे, आकाश भगत,तुषार (बंटी) जाधव, प्रज्वलित कांबळे, नितेश कांबळे, संदेश कांबळे, उमेश जाधव, हितेश, सिद्धांत जाधव, शुभम कांबळे, निखिल थोरात, आसिफ शेख, गौरव शिर्के, अथर्व बापेरकर, हर्षल सकपाळ, चारू कांबळे, जुगल धोत्रे, कल्पेश पवार,योगेश कांबळे.