शेगाव पोलिसांनी पकडला तांदळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
वरोरा : ट्रक द्वारे धान्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त होताच शेगाव पोलिसांनी या ट्रकला ताब्यात घेऊन अवैध तांदळाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालक व ट्रक मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शेगाव (बूज) पोलीस स्टेशनला गुरुवार 17 ऑगस्ट रोजी रात्री पोलिसांना माहिती मिळाली की 14 चाके असलेल्या ट्रकमधे अवैध सरकारी धान्य दुकानाचा तांदूळ बाजारात विक्री साठी नेला जात आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने शेगाव पोलिसांनी त्वरेने कारवाई केली.
शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम हे आपल्या कर्मचाऱ्यासह खातोडा जुना बस स्थानक येथे गोवंश कारवाई करत असताना नाकाबंदी केली. त्यांनी वरोड्याकडून येणाऱ्या ट्रकला थांबून चालकास विचारले असता त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता त्यानी आपले नाव माणिकराव रामाजी कोचे वय 63 रा. कासारवाडी जिल्हा दुर्ग छत्तीसगढ असे सांगितले.
या ट्रक मध्ये काय आहे असे विचारले असता चालकांनी पुन्हा उडवाउडवीचे उत्तर देणे सुरू केले. पोलीस कर्मचा-यांनी पाहणी केली असता त्यामध्ये तांदूळ असल्याचे दिसून आले. ट्रक चालकाला मालकाला बोलवा असे सांगितले असता मालक हजर झाले नाही.
या ट्रक मधील तांदूळ हा शासकीय कंट्रोलचा तांदूळ दिसून येत असल्याने वरोडा येथील पुरवठा निरीक्षक यांचे प्राथमिक अहवाल प्राप्त करून या ट्रकचालक व मालक यांच्यावर इसी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक जनबंधू मॅडम, चिमुरी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन शेगाव (बूज) चे ठाणेदार अविनाश मेश्राम, पीएसआय सुरजुसे एसआय पडोळे, हेड कॉन्स्टेबल मेश्राम, मदन येरने, पोलीस आमदार निषाद राकेश , प्रफुल कांबळे आदींनी केली.