यावल येथे घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरात अनेक रक्त दात्यांनी केले पहा असे रक्तदान
सुपडू संदानशिव
यावल तालुका प्रतिनिधी
📱9561200938📱
यावल येथे 15 ऑगस्ट रोजी वीर शिवा काशीद फाऊंडेशन, यावल आणि जय हिंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरात अनेकांनी रक्तदान करून आपल्या देशभक्तीचे, आपल्या समाजसेवेचे आणि आपल्या उदार कर्तृत्वाचे दर्शन घडविले. आपल्या एका रक्तदानामुळे एका गरजू व्यक्तीचे प्राण वाचत असतात पर्यायाने एका कुटुंबावरील संकट टळत असते. हा उदार विचार डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी मोठ्या उत्साहाने या रक्तदान शिबिरात भाग घेतला.या रक्तदान शिबिराचे आयोजन जळगाव येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आले होते. या शिबिराला यावल रावेर मतदार संघातील माजी आमदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमोल भाऊ जावळे यांच्या सह उमेश फेगडे, भुषण फेगडे, ऋषिकेश बारी भाजपा कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट दिली.
हे रक्तदान शिबिर यशस्वी व्हावे म्हणून जय हिंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यावलचे चेअरमन महेशशेठ गडे, संचालक योगेश वाणी, निलेश पराशर,मनोज करणकर, संजय गडे, डॉ. योगेश गडे, संजय जोगी, शाखा अधिकारी निवृत्ती पाटील, भाजपा यावल शहराध्यक्ष निलेश गडे तसेच वीर शिवा काशीद फाऊंडेशनचे शशिकांत वारुळकर, योगेश वारुळकर, रणजित ठाकरे, मनोज चौधरी, तेजस धांडे, अनिल उंबरकर खिरवड येथील किरण सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.