स्वातंत्र्याचे शिल्पकार: जननायक तंट्या भिल्ल

57

स्वातंत्र्याचे शिल्पकार: जननायक तंट्या भिल्ल

तंट्या भिल्ल हा गेल्या दशका तील एक आदिवासी नायक. तो साधा-भोळा होता. त्याची विडलोपार्जत जमीन कर्जापोटी पाटलाने बळकावली. कर्ज फेडू इच्छिणाऱ्या तंट्याला खोट्या गुन्ह्यात
अडकवले. जेलमध्ये पाठिवले. शिक्षा भोगून आलेला तंट्या मोलमजुरी करू लागला. पुन्हा गावकऱ्यांनी
पाटलाच्या मुलीच्या प्रेमसंबंधाचा आरोप ठेवून हुसकावून लावले. दुसऱ्या वेळी पुन्हा खोटा आरोप ठेवून
जेलमध्ये डांबले.

माणूस म्हणून शांत जीवन जगण्याची धडपड करणाऱया तंट्याला जमीन हडप करणारे पाटील, मालगुजार, त्यांना साथ देणारे सावकार, पोलीस आणि सर्वच शासन यंत्रणेने जगणे असह्य केले. अन्यायाने पिचून गेलेला तंट्या बदलत गेला. अपल्या व्यवस्थेशी आणि बलाढ्य ब्रिटिश राजसत्तेशी लढा सुरू केला.

तंट्या मालगुजार-सावकारांना लुटू लागला. पोलीस चौक्यांवर हल्ला करू लागला. सत्ताधाऱयांना
डाकू वाटणारा तंट्या डाकू नव्हताच. सावकार-मालगुजारांना लुटून तो गरीबांना वाटून टाकी. दुष्काळात
सावकारांची आणि सरकारी धान्याची गोदामं फोडून गरिबांना मोफत धान्य वाटू लागला. गरजूंना बिनव्याजी कर्ज देऊ लागला. स्त्रियांना तो पाठीराखा वाटत होता.

गरिबांचा वाली, त्यांचा रक्षणकर्ता, जंगलचा सार्वभौम राजा अशी त्याची प्रितमा जनमाणसांत
बनली होती. त्याच्या जिवंतपणीच खानदेश – नर्मदा खोऱ्यात दंतकथा बनला होता. त्याच्या कथा आणि गीतं
घराघरात पोहोचली होती. ज्या काळात पुण्यात महात्मा जोतीराव फुले समाज सुधारणेसाठी कार्यरत होते, त्याच काळात हा भिल्ल नायक आदिवासी – किसान ह्यांच्या पारतंत्र्याच्या बेड्या झुगारून देण्याचा एकाकी लढा देत होता.

ज्या काळात होळकर, निजाम, शिंदे आणि इतर संस्थानिक ब्रिटिश सत्तेची हुजरेगिरी करण्यात
मश्गुल होते, त्या काळात हा लोकविलक्षण नायक जनाधारावर झुंजत होता. अकरा वर्षे ब्रिटिश सत्तेच्या
तोंडचे पाणी तंट्याने पळिवले . त्याची एकाकी झुंज आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातील एक सोनेरी पान आहे.

तंट्याला पकडण्यासाठी १०,५०० रुपये आणि पंचवीस एकर जमिनेचे बक्षीस ब्रिटिशांनी देऊ केले . होळकरांनी वेगळे बक्षीस ठेवले . ‘तंट्या पोलीस ’नावाची स्वतंत्र फौज स्थापन केली. गावागावांत तंबू
उभे करून पोलीस चौक्या उभ्या केल्या. मालगुजारांना मोफत शस्त्रे वाटली; तरीही हा वीर अकरा वर्ष पोलिसांच्या हातांवर तुरी देउन डोंगरदऱयांत तळपत होता.

तंट्याचे जीवन मानवतेचा संदेश देणारे होते. त्याच्यात नेतृत्वाचे सगळे गुण होते. तो निस्वार्थी
होता. स्वतःसाठी त्याने काही ठेवले नाही. त्याची प्रचंड बुिद्धमत्ता, चपळाई, प्रसंगावधान, दयाळूपणा,
सभ्यपणा, न्यायिदृष्टी, उदार दृष्टिकोन – या गुणांबद्दलच्या लोककथा – लोकगीते गावोगाव पसरली होती.
हे सारे तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रव्यवहारात अहवालात नमूद करून ठेवले आहे.

आदिवासी – शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक होता तंट्या. त्याने सातपुडाच्या दोन्ही
भागांतील – खान्देश व नर्मदा खोऱ्यातील आदिवासी शेतकऱ्यांत राष्ट्रीयत्वाची भावना जागवली.

दुर्दैवाने इतिहासात तंट्याची नोंद एक डाकू व दरोडेखोर अशीच झाली अहे. इतिहास लिहणाऱ्यांनी गुन्हेगार जातीत जन्मलेल्या तंट्या भिल्लावर वर हा अन्याय केला होता. महाराष्ट्रातील लोककथा, लोकनाट्य, पोवाडे आणि लोकगीतांतही तंट्या लोकांसमोर येत होता; परंतु एक डाकू आणि दरोडेखोर हा कपाळावर डाग घेउनच.
एक दशक हा क्रांतिवीर बेदखल रािहला. तंट्याचा शोध घेत असताना सेंट्रल प्रोव्हिन्स अँड
बेरार, बॉम्बे प्रोव्हिन्सस, इंदोर दरबारच्या पुरातत्व खात्यात धुंडाळा घेतला. तंट्याबद्दलची मूळ पोलीस
कागदपत्रे, न्यायालयीन दस्तऐवज, उपलब्ध लोकगीतामधून तंट्याचं हे चरित्र समोर आलं.

बाबा भांड, जननायक तंट्या भिल्ल पुस्तकातून