अक्कलकुवा तालुक्यातील खाई या गावात रानभाजी महोत्सवाचे आयोजन…

50

अक्कलकुवा तालुक्यातील खाई या गावात रानभाजी महोत्सवाचे आयोजन…

प्रकाश नाईक

नंदुरबार ब्यरो चीफ

मो. 📱 9511655877

नंदुरबार : दि. 21 ऑगस्ट अक्कलकुवा तालुक्यातील खाई येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रानभाज्यांचे आहारातील महत्व आणि दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश व्हावा यासाठी कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नंदुरबार यांच्या वतीने जिल्ह्यात 19 ऑगस्ट 2023 रोजी खाई येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मानवी आरोग्यामध्ये सकस आहाराचे महत्व अनन्य साधारण आहे. जंगलात तसेच शेतशिवारात नैसर्गिकरित्या उगविल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या, फळभाज्या, कंद, शेंगा यात शरीरास आवश्यक असणारे औषधी व पौष्टीक घटक विपूल प्रमाणात आढळतात. या रानभाज्यांचा हंगाम पावसाळ्याच्या सुरवातीपासून ऑक्टोबरपर्यंत चालतो.

या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी निलेश गठरी यांनी रानभाजीचे महत्व व मार्केटिंग या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संपत पाडवी सरपंच,तर सचिन लांडगे पर्यवेक्षक खापर, बिरारे सर कृषी पर्यवेक्षक खापर,डी. पी.गावित कृषी पर्यवेक्षक मोलगी, कृषी सहाय्यक भूषण वसावे, कृषी सहाय्यक बळवंत वसावे,कृषी सहाय्यक गायत्रि पाडवी मॅडम, दिलवरसिंग वळवी पो.पाटील, नरपत वसावे कोतवाल, गेमलसिंग महाराज,खेमसिंग वसावे, सापा दादा, मुकेश दादा पाडवी, बाज्या दादा, दिनेश वसावे सा. कार्यकर्ता वनसिंग पाडवी सर कालश्या पाडवी ग्राम पंचायत शिपाई, बचत गटातील महिला पुष्पाताई वसावे निलाताई वसावे, ओजमी वळवी आसमीबाई लिलाताई पाडवी, व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आदी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पटले सरांनी केले व आभारप्रदर्शन एल.डी. वसावे कृषी सहाय्यक यांनी मानले. व कार्य यशस्वीतेसाठी गावातील लोकांनी परिश्रम घेतले.