शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ त्वरित द्यावा; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
शिवाजी निरमनाळे
लातूर प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत गेल्या महिनाभरापासून पाऊस झाला नसल्याने खरीप पिके कोमेजून जात आहेत. यामुळे नुकसान शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागले आहेत,सलग गेल्या 25 दिवांसापासून पाऊस झाला नाही,पिक विमा योजने अंतर्गत सलग 21 दिवस पाऊस पडला नसल्यास नियमानुसार शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांना देणे पिक विमा कंपन्यांना बंधनकारक व मा.जिल्हाधिकारी यांना त्याचे अधिकार आहेत.त्यानुसार शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ दिला जावा व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवासी उपजिल्हाधिकारी विजय ढगे यांना निवेदन देवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव संजय शेटे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार,रेखाताई कदम,मदन काळे,बक्तावर बागवान,परमेश्वर पवार,डी.उमाकांत,मुन्ना तळेकर,समीर शेख,विशाल देवकते,ऍड.इरफान शेख,प्रा.प्रशांत घार सर,ऍड.शेखर हविले,श्रीकांत मगर,पुरूषोत्तम पाटील,अण्णासाहेब पाटील गंगापुरे,प्रविण साळूंके,निखिल मोरे,अभि पांडे,इम्रान सय्यद यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.