भारतात घडणार आहेत आज दोन घटना, ज्या नेतील भारताला जगात सर्वोच्च स्थानी…

 

मनोज कांबळे: भारतीयांमध्ये एक महत्त्वाकांक्षा असते,आम्ही जे करतो त्यात जगातील सर्वोत्कृष्ट असावे. हीच आकांक्षा घेऊन आज दोन मोठ्या घटनां आज २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतात होणार आहेत. चंद्रयान ३ हे चंद्रावर उतरणार आहे आणि प्रग्गनानंधा हा मॅग्नस कार्लसन ला FIDE World Cup 2023 मध्ये हरविण्याचा प्रयत्न करणार आहे. हे दोन्ही काम करणे अतिशय कठीण आहेत, परंतु दीडशे कोटी भारतीयांच्या शुभेच्छा त्यांच्यामागे आहेत.

एकिकडे चंद्रयान-३ द्वारे भारत चंद्रावर जो प्रकल्प करण्याचा प्रयत्न करीत आहे ते अतिशय कठीण आहे. कारण आजवर जगभरात ते कुणीहि केलेले नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशांनी आजवर चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक यान लँड केलेली आहेत. परंतु चंद्रयान-३ हे चंद्राच्या महिन्याच्या दक्षिणी ध्रुवक्षेत्राजवळ लँड करण्याची इसरोची योजना आहे. हे सोपे काम नाही आणि भारतीय श्वास रोखून २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्या. ६.०४ वाजता हे लँडिंग यशस्वी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तर दुसरीकडे अझरबैजानच्या बाकूमध्ये, एक १८ वर्षाचा प्रग्गानंधा भारतीय बुद्धिबळ खेळाडू जगातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडू मॅग्नस कार्लसनच्या समोर बसेल आणि त्याला FIDE बुद्धिबळ विश्व कप २०२३ अंतिम सामन्यांमध्ये हरविण्याचा प्रयत्न करेल. प्रग्गानंधासाठी हे सोपे काम नाही. मॅग्नस कार्लसनला हा पूर्ण ताकतीने विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रग्गानंधा त्याला हरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. याआधी प्रग्गनंधा याने जागतिक क्रमवारीतील ३ नंबरचा हिकारु नकामुरा आणि क्रमांक २ फेबियानो कारुआना यांच्यावर विजय मिळवला आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी मॅग्नसला हरवलं तर प्रग्गानंधा FIDE विश्व कप जिंकलेला सर्वात कमी वयोमान असलेला बुद्धिबळ खेळाडू बनण्याचा इतिहास रचू शकतो. हा अंतिम सामना संध्याकाळी ४:३० वाजता सुरुवात होणार आहे.

चांद्रयान ३ दक्षिणी ध्रुवावर उतरणे आणि मॅग्नस कार्लसनला हरवणे हे दोन्ही अत्यंत कठीण काम आहेत. परंतु चंद्रयान-३ (ISRO) आणि प्रग्गनंधा हे जिवंत उदाहरण आहेत कि लक्ष्य कितीही कठीण असले तरी ते सध्या करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. जगात अशी काही कामे आहेत जी केवळ अशक्य आहेत असे लोकांचे म्हणजे आहे. परंतु तुमच्या मेहनतीने तुम्ही हि अशक्यप्राय काम करून दाखवतील, तर जगाचा तुमच्याकडे बघण्याचा आणि विचार करण्याचा दृष्टीकोन बदलतो. चंद्रयान-३ (ISRO) आणि प्रग्गनंधा आज हि अशक्यप्राय ध्येय सध्या करण्यात यशस्वी होऊ दे, हीच साऱ्यांची इच्छा आहे. पण जरी ते अयशस्वी झाले तरी या अशक्यप्राय गोष्टी सध्या करण्यासाठी त्यांनी केलेल्या खडतर प्रवासाचा भारतीयांना अभिमान असेल.

– From ChessIndia Twitter Post

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here