डॉ.नि.तु.पाटील यांचा साकळी येथे नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल सत्कार

50

डॉ.नि.तु.पाटील यांचा साकळी येथे नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल सत्कार

सुपडू संदानशिव

यावल तालुका प्रतिनिधी

📱9561200938

           वरणगाव येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ तथा भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे संयोजक डॉ.नि.तु.पाटील यांनी नुकतीच पायी चालत एकट्याने १०८ दिवसांमध्ये जवळपास३५०० किमी ची माता नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.त्याबद्दल डॉ.पाटील यांचा साकळी ता.यावल येथे श्रीसंत गजानन महाराज फाउंडेशन,साकळीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.यावेळी त व्यासपिठावर सत्कारमूर्ती डॉ. नि.तू.पाटील,हजरत रशिदबाबा आश्रमाचे गादीपती जितेंद्र(छोटूबाबा)नेवे,फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी हे मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत गजानन महाराज प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर शाल,श्रीफळ, मानचिन्ह तसेच पुणेरी फेटा देऊन डॉ.पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

सदर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन हजरत रशिदबाबा आश्रमात करण्यात आलेले होते.सत्कारमूर्ती डॉ. नि.तू.पाटील यांनी माता नर्मदा परिक्रमेतील अनुभव आपल्या मनोगतात कथन केले.त्याचप्रमाणे डॉ.सुनिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाप्रसंगी युवावर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार हेमंत जोशी यांनी केले. तसेच कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन चंद्रकांत नेवे यांनी तर आभार प्रदर्शन हर्षल बाविस्कर यांनी केले.