यावल महाविद्यालयात अर्थशास्त्र व वाणिज्य मंडळाचे पहा कसे केले उद्द्घाटन
सुपडू संदानशिव
यावल तालुका प्रतिनिधी
📱9561200938📱
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,यावल येथे प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अर्थशास्त्र व वाणिज्य मंडळाच्या उद्द्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील उपप्राचार्य तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.ए.पी.पाटील हे होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा न्हावी तालुका यावल व्यवस्थापिका सिंपल कुमारी ह्या उपस्थित होत्या.
यावेळी कुमारी सिंपल यांनी बँकेच्या आर्थिक व्यवहाराबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी कुठलीही बँक ही तारणाशिवाय कर्ज देत नाही. बँक ही सुद्धा आर्थिक दृष्टीकोणातूनच निर्माण झालेली आहे असे त्यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.ए. पी.पाटील यांनी अर्थशास्त्र व वाणिज्य विषयाचे महत्त्व स्पष्ट करतांना पैशाचा उपयोग कसा करायचा?पैसा केव्हा?कोठे?व कसा खर्च करावा? हे वाणिज्य विषयात शिकविले जाते असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.निर्मला पवार,सूत्रसंचालन प्रा.रजनी इंगळे यांनी केले, तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एम.डी. खैरनार यांनी मानले.सदर कार्यक्रमाला डॉ. एस पी कापडे डॉ.पी व्ही पावरा प्रा. सी. टी. वसावे,प्रा.डॉ.वैशाली कोष्टी,प्रा.प्रतिभा रावते,प्रा.संतोष जाधव,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.सोनल बारी हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.