असा आहे माझा गडचिरोली जिल्हा…!
आज माझ्या गडचिरोली जिल्ह्याचा वर्धापन दिन आहे ह्या शुभ दिनानिमित्त जिल्हा वासियांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा झाडीमायेच्या कुशीत असलेला माझा जिल्हा जगापेक्षा वेगळा आहे. माझ्या जिल्ह्याची ओळख आदिवासी जिल्हा म्हणून आहे माझ्या जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, पर्लकोटा, गोदावरी, खोब्रागडी ,सतीनदी अशा मोठ्या नावाजलेल्या नद्या आहेत त्यांचे संगम सुद्धा आहेत. माझ्या जिल्ह्यात अनेक जातीधर्माचे लोक राहतात त्यांची बोलीभाषा हि वेगवेगळी आहे खास करून झाडीबोली, गोंडी,मराठी भाषा बोलली जाते.माझ्या जिल्ह्यात जुन्या राजांचे राजवाडे आहेत तसेच लोहखनिजांची खाण आहे मुख्य नद्यांपैकी वैनगंगा नदीच्या काठावर भगवान मार्कडेश्वराचे हेमाडपंथी देऊळ आहे आज त्या , मार्कडा तीर्थस्थानाला विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाते. माझ्या जिल्ह्यात धान, मिरची, मका, कडधान्य जास्त प्रमाणात बळीराजा घेत असतो व मोलमजुरीचे काम करून आंनदाने खाऊन, पिऊन सुखाने जगत असतो,माझ्या जिल्ह्यात महा विभूती होऊन गेलेले आहेत व आपल्या महान कार्याने जगात एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केली आहे. त्यांना मी वंदन करते.
भलाही माझा जिल्हा दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जात असेल तरी माझ्यासाठी काश्मीर आहे, इथे गोर गरीबांना तसेच बळीराजाला जोडधंदा म्हणून दरवर्षी उन्हाळ्यात तेंदूपत्ता तोडणी उपलब्ध असते. हिरवेगार जंगलात अनेक प्रकारच्या रानभाज्या, चारा, टेंमरे,आवळे, फळे खायला मिळत असतात. निसर्गाच्या सानिध्यात कोरची ते,मसेली या गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आगरी झरण नावाचे नावाजलेले स्थळ आहे अनेक भाविक भक्त गुरुपौर्णिमेला तसेच कोजागिरी पौर्णिमेला बहुसंख्येने जातात. अतिशय घनदाट जंगलात टिपागड हे एक प्रकारचे पर्यटन स्थळ आहे त्याचे नाव बरेचजण घेत असतात त्याच प्रमाणे माझ्या जिल्ह्यात नावाजेले साहित्यिक, कवी,लेखक,लेखिका आहेत तसेच समाजकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. माझ्या जिल्ह्यात वडसा असे एक शहर आहे त्याला कपडा बाजारासाठी ओळखल्या जाते दुरवरून लोक कपडे घेण्यासाठी येत असतात तशीच पुन्हा एक वेगळी ओळख आहे ती म्हणजेच तेथे नाटकाचे अनेक प्रेस आहेत दिवाळी पासून सतत चार महिने गावखेड्यात तसेच बाहेर जिल्ह्यात सुद्धा शंकरपट, मंडई निमित्त नाटक होत असतात.
माझ्या जिल्ह्यात अनेक कलावंत, गायक आहेत आपल्या कलेच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव मोठे केले आहेत माझा जिल्हा या निसर्गात भोभून दिसतो माझ्या जिल्ह्याची कोणी स्तूति करतात तेव्हा, मला अजून बरं वाटते.माझ्या जिल्हृयात खूप काही शिकण्यासारखे आहे व येतील संस्कृती, खाद्यपदार्थ, बोलीभाषा आणि बरंच काही आहे सर्वगुण संपन्न असलेला माझा जिल्हा माझ्यासाठी महान आहे मला अभिमान आहे की, मी गडचिरोली जिल्ह्याची रहिवासी आहे जिकडे, तिकडे तलाव, बोड्या लहान मोठे डोंगर, अगदी बघताना आनंद होते तसेच हेमलकसा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. माझ्या जिल्ह्याविषयी कितीही लिहिलं तरी कमीच आहे कारण माझा जिल्हा जगात वेगळा आहे.
सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
७८२१८१६४८५