महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी गमावलेली विश्वासार्हताच, बिआरएस पक्ष वाढण्यास कारणीभूत आहे – संतोष पाटील, मुख्य संपादक शिवार माझा
जितेंद्र कोळी
पारोळा तालुका प्रतिनिधी
मो: 9284342632
राज्य – महाराष्ट्रात राजकीय पक्षांची अस्थिरता आणि जनतेचा झालेला भ्रमनिरास भारत राष्ट्र समितीला पोषक वातावरण निर्माण करत आहे, महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष संघटना या शेतकऱ्यांना इथल्या गरीब दुबळ्या सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही, निवडणुकीच्या अजंड्यावरून शेतकरी दिनदुबळा सामान्य माणूस पूर्णपणे गायब झाल्याने या लोकांच्या हिताचं कुठलंही काम होताना दिसत नाही,
शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सगळ्याच पक्षांचे ध्येयधोरण शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहेत, शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठांचे वाढलेले भाव आणि शेतीचं निमपट झालेले उत्पन्न आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप करून जाणून-बुजून शेती पिकांचे पाडलेले भाव या सर्व गोष्टींचा विचार करता हा महाराष्ट्रातील सूज्ञ शेतकरी या राजकीय पक्षांना नक्कीच मतदानाद्वारे घरी बसल्याशिवाय राहणार नाही, सर्व शेतकरी संघटनेतील लोक आपापल्या परीने कुठल्यातरी राजकीय पक्षाशी सलगी करून आपलं बस्तान बसवताना दिसत आहेत, मात्र या लोकांना गरीब दुबळ्या शेतकऱ्यांशी त्यांच्या विकासाशी काहीच देणं घेणं नाही, शेतकऱ्यांच्या अनेक कल्याणकारी योजना शेतीसाठी लागणारे विज बिज पाणी वेळेवर पतपुरवठा वेळोवेळी कर्जात काही सवलती या गोष्टी हे लोक करत नाहीत, महापुरुषांच्या नावाने दोन वेळा कर्जमाफी होऊन ही शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच आलेलं नाही, जातीयवाद करून दंगली घडवून निव्वळ राजकीय वातावरण तापवून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील नेत्यांनी केलेला आहे,
कुठल्याच पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही कारण एकमेकांचा द्वेष करणारे कधी एका ताटात जेवतील ते सांगता येत नाही आणि तसंच घडलेला आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी या पक्षातून त्या पक्षात गेलो असं म्हणणारा एकही राजकीय पक्ष किंवा नेता नाही, या देशात व महाराष्ट्र राज्यात अनेक कल्याणकारी योजना शेतीसाठी असणारे ध्येयधोरण, रचनात्मक असे विकास काम जसे शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, नोकरी ,सामाजिक सौख्य राजकीय स्थिरता या गोष्टींना तीलांजली देऊन हे लोक सत्तेसाठी काही पण असे वागत असल्याने महाराष्ट्रातील गरीब दिन दुबळ्या जनतेचा मतदात्याचा या लोकांवरचा विश्वास उठून गेलेला आहे,
अशातच काही वर्षांपूर्वी निर्माण झालेलं तेलंगणा राज्य त्या राज्यातील नेतृत्व केसीआर साहेब त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम योजना या वाखाण्याजोग्या आहेत, त्या योजना नुसत्या कागदावरच्या कागदावर न राहता प्रत्यक्षपणे अमलात आणण्यासाठी केसीआर सरकार शर्तीचे प्रयत्न करत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत सामान्य माणसासाठी तशाच योजना आहेत (खरे म्हणजे काळे कायदे ध्येय धोरण हे सगळ्याच राज्यांमध्ये आहेत) तरी तेलंगणा सरकारने आपल्या राज्याचा विकास साधलेला आहेच,
महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतीमालाला भाव नाही आणि हाती आलेल्या पिकाला हे कपाळ करंट सरकार कधी निर्यात बंदी तर कधी आयात बंदी करून भाव पाडत आहे आणि शेतकऱ्याचे नुकसान करून शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे, मात्र तेलंगणा राज्यांमध्ये साहेबांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण खूपच कमी झालेलं असून त्या ठिकाणी सर्व समाज उद्योगपती शेतकरी आनंदाने नांदतांना दिसून येत आहेत, म्हणूनच या महाराष्ट्रातील सामान्य जनता शेतकरी मतदार हे भारत राष्ट्र समितीकडे आकर्षिले जात आहेत व महाराष्ट्रातील सत्याधारांना निश्चितच घरी बसवण्याचा प्रयत्न करत आहेत, या ठिकाणी या मस्तावलेल्या राजकीय नेत्यांच्या अर्थात राजकीय हल्यांच्या टक्करीत सामान्य माणसाचं व गरीब दुबळ्या जनतेचे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे हे सांगण्याची गरज नाही.