SCचा दिलासा, एकबोटेंची अटक २० फेब्रुवारीपर्यंत टळली

109

मिडीया वार्ता न्यूज
नवी दिल्ली: कोरेगाव-भीमा हिंसाचारातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना सुप्रीम कोर्टाने त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज २० फेब्रुवारीपर्यंत मंजूर केला. यामुळे एकबोटे यांची अटक तूर्तास टळली आहे. हायकोर्टाने एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

हायकोर्टाने कोणत्या कारणासाठी एकबोटे यांना जामीन नाकारला याचा अभ्यास करून सुप्रीम कोर्ट त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २० फेब्रुवारीला पुढील सुनावणी घेणार आहे. यामुळे एकबोटेंच्या अटकेबाबतचे चित्र २० फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.

पुणे सत्र न्यायालयाने एकबोटे यांच्याविरोधात कालच अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने अंतिरिम जामीन मंजूर करत त्यांना काहीसा दिलासा दिला आहे.