खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे समस्त कामगारांनी मानले आभार…

57

नगर दक्षिणचे खासदार तथा साईसंस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑप सोसायटी ली शिर्डीचे मार्गदर्शक सन्मा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे संस्थेच्या समस्त कामगारांच्या वतीने शतशः आभार…

संजय महाजन

शिर्डी प्रतिनिधी

विद्यमान संचालक मंडळ सत्तेत आल्यापासून सन्मा खासदार तथा संस्थेचे मार्गदर्शक डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी संस्थेच्या कामगारांबाबत अनेक हितावह निर्णय घेतले, संस्थेच्या कामगारांना स्केल ऑर्डर देणे, सेवानियम लागू करणे, अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या कंत्राटी कामगारांना संस्थेच्या सेवेत कायम करणे, लग्न व प्रासंगिक अनुदान लागू करणे, वाढीव कर्ज मर्यादा, हक्काच्या रजा असे अनेक कामगारहिताचे प्रश्न मार्गी लावले असून आत्ता कामगारांच्या पगारवाढीच्या विनंतीचा विचार करून तो प्रश्नही मार्गी लावला असून, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देऊन कामगार वर्गात आणि त्यांच्या कुटूंबात आनंद निर्माण केल्याबद्दल संस्थेच्या समस्त कामगारांच्यावतीने सन्मा. खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील तसेच संस्थेचे विद्यमान चेअरमन सौ. श्रद्धाताई विजयराव कोते, व्हा.चेअरमन श्री.दिनेशजी कानडे तथा सर्व संचालक मंडळ संचालक प्रतापराव कोते, संचालक तुषार जी शेळके, संचालक यादवराव कोते, संचालक जितेंद्र गाढवे, संचालक दीपक धुमसे, संचालक संदीप बनसोडे यांचे शतशः आभार मानले.