कौलाळे ग्रामपंचायत मधील नदी, नाल्या, तलावात रासायनिक द्रव, टी-शेल टाकण्यास बंदी, ग्रामसभेत ठराव मंजूर

61

कौलाळे ग्रामपंचायत मधील नदी, नाल्या, तलावात रासायनिक द्रव, टी-शेल टाकण्यास बंदी, ग्रामसभेत ठराव मंजूर

सुनिल जाबर 

जव्हार प्रतिनिधी

जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे येथील आज दि.29 ऑगस्ट 2023 रोजी भोवरदाचापाडा येथे ग्रामपंचायत सभा आयोजित केली होती.लोकनियुक्त सरपंच . वैशाली अशोक धोडी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत कौलाळे कार्यक्षेत्रातील नदी, नाले, तलाव, बंधाऱ्यातील पाण्यात (पाणी दूषित करणारे )रसायनिक द्रव्य, जल साठ्यामध्ये आवाज टाकणे या प्रकरामुळे मोठ्याप्रमाणात नसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होऊन पाणी साठे दूषित होतात.

त्यामुळे अशा प्रकारावर पूर्णपणे बंदी घालुन असे कृत्य करणाऱ्यावर ग्रामपंचायत मार्फत फोजदारी गुन्हा नोंद करून सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामपंचायत कौलाळे या कार्यक्षेत्रामध्ये नदी नाल्यांमध्ये,बंधारे, तलाव, कोणीही ग्रामस्थ लाईट करण रासायनिक द्रव्य, टी-शेल, टाकणार नाही कोणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई कडक करण्यात येईल- शंकर मेढा, उपसरपंच