वावर आश्रमशाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून केली रक्षाबंधन

54

वावर आश्रमशाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून केली रक्षाबंधन

सुनिल जाबर

जव्हार प्रतिनिधी

   रक्षाबंधन हा हिंदुंचा एक लोकप्रिय वार्षिक सण मराठी कॅलेंडर नुसार रक्षाबंधनाच्या श्रावण महिन्यातील पौर्णिमेला पूर्ण भारतभर ऑगस्ट महिन्यात साजरा केला जात असून या निमित्त पालघर जिल्यातील जव्हार तालुका मधील रयत शिक्षण संस्थेची प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वावर येथे आज दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक मिळून रक्षाबंधन सण हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

  रक्षाबंधन सण हा भारतात नव्हे तर जो नेपाळ,मॉरिशस व अन्य अनेक देशांमध्ये विशेषत हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो .या दिवशी सर्व वयोगटातील बहीण त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे पवित्र आणि आकर्षक धागा विधिवत बांधतात .आणि ही राखी बांधून त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जात असे.या दिवशी सर्व जण नवीन कपडे घालून मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात .परंतु वावर आश्रमशाळा निवासी असल्यामुळे वेगवेगळ्या पाडा ,गावातून मुले मुली शिक्षण घेत असल्यामुळे सगळे विद्यार्थी हे घरी न जाता शाळेत कार्यक्रम आयोजित करून आप आपल्या वर्गातल्या मुलींनी ह्या मुलांना राखी बांधत एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गारुडकर सर ,राठोड सर ,ठाकरे सर , बर्डे सर व निकवाडे सर आणि विद्यार्थी व इतर मान्यवर आणि शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.