भीषण अपघातात पती-पत्नी ठार, नागपूर-चंद्रपूर मार्गावरील घटना

51

भीषण अपघातात पती-पत्नी ठार, नागपूर-चंद्रपूर मार्गावरील घटना

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

📱 8830857351

वरोरा 31 ऑगस्ट:नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वरोड्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या फत्तापूर गावाच्या वळण रस्त्यावर दुचाकी व हायवा समोरासमोर धडकल्या. त्यात दुचाकी वरील पत्नी जागीच ठार, तर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडला. पंचफुला कुळसंगे (45) व प्रभाकर कुळसंगे (50, रा. मजरा) अशी मृतकांची नावे आहेत.

तालुक्यातील मजरा येथील रहिवासी पंचफुला कुळसंगे व प्रभाकर कुळसंगे हे स्प्लेंडर दुचाकी (एमएच 33 डी 3264) ने फत्तापूर गावाकडून मजरा गावाकडे येत होते. यावेळी नागपूर-चंद्रपूर मार्गालगतच्या फत्तापूर गावाच्या वळण रस्त्यावर हायवा (सीजी 12 बिडी 0103) व दुचाकी समोरासमोर धडकले. ही धडक इतकी जबर होती कि त्यात दुचाकीवरील पंचफुला कुळसंगे या हायवा ट्रकच्या मागील चाकात अडकून जागीच ठार झाल्या. तर प्रभाकर कुळसंगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वरोडा पोलिसांनी हायवा चालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे