आईने स्वत:च्या प्रियकराला मुलीवर बलात्कार करणाची दिली परवानगी. 15 वर्षीय मुलगी गरोदर
पोलिसांकडून आई आणि तिच्या प्रियकराला अटक; पीडित मुलीनं दिला बाळाला जन्म
चेन्नई:- माय-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार चेन्नईत घडला आहे. एका आईने स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या प्रियकराची परवानगी दिली. त्यामुळे 15 वर्षीय मुलगी गरोदर राहिली. तिनं एका बाळाला जन्म दिला. यानंतर पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली.
36 वर्षांची नंदिनी काही वर्षांपूर्वी पतीपासून वेगळी झाली. त्यानंतर तिचे 32 वर्षांच्या शेकरशी प्रेमसंबंध होते. शोलिनगानाल्लुरचा रहिवासी असलेला शेकर रंगारी काम करतो. नंदिनीला भेटण्यासाठी येणाऱ्या शेकरनं तिच्या 15 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केला. याची तक्रार मुलीनं नंदिनीकडे केली. त्यावर नंदिनीनं पीडित मुलीला सहकार्य कर, असा सल्ला दिला.
शेकर करत असलेल्या बलात्कारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये नंदिनीने तिला आपल्या भावाकडे पाठवलं. मुलगी गरोदर असल्याची माहिती तिनं भावाला दिली नाही. त्यानंतर पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार मामांना सांगितला. त्यानंतर त्यांनी नंदिनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला.
नंदिनीचा शोध न लागल्यानं मामांनी मडीपक्कम येथील महिला पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉस्को कायद्याच्या अंतर्गत नंदिनी आणि शेकरवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित मुलीला पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आलं. तिथं तिनं ऑक्टोबरमध्ये बाळाला जन्म दिला. नंदिनी आणि शेकरचा शोध घेणाऱ्या पोलिसांना डिसेंबरमध्ये मोठं यश मिळालं. 30 डिसेंबरला दोघांनाही अटक करण्यात आली.