ग्रामस्थांनी गाजविली ग्रामसभा, ग्रामसेवक यांच्यावर गावातील न सुटलेल्या समस्यांचा भडीमार

53

ग्रामस्थांनी गाजविली ग्रामसभा, ग्रामसेवक यांच्यावर गावातील न सुटलेल्या समस्यांचा भडीमार

मन्सूर तडवी

जिल्हा प्रतिनिधी

कुरवेल ता. चोपडा येथील ग्रामपंचायत येथे आज दिनांक ३०/८/२०२३ रोजी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी तसेच काही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने स्थानिक ग्रामस्थ संतापले होते. त्यातच ग्रामसभा नियमित घेण्यात येत नसल्याचे सांगत ग्रामस्थ यांनी ग्रामसेवक श्री. स्वप्नील निनायदे यांच्या वर एका नंतर एक गावातील समस्यांचा पाढा वाचून दाखविला. गावातील विकास कामांची यादी सार्वजनिक करावी या साठी यावेळी ग्रामस्थ आग्रही दिसून आलेत.

ग्रामसेवक यांच्या सोबत आमच्या प्रतिनिधी यांनी चर्चा केली असता, ग्रामसेवक हा जनतेच्या हितासाठीच ग्रामपंचायत येथे कार्यरत असतात, तसेच मी देखील आहे आणि कुरवेल गावातील सर्व समस्यांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर आपण नियमानुसार सर्व समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे सांगितले.

आता ग्रामस्थांची अपेक्षा हीच आहे की, ग्रामसभा नियमित घेण्यात यावी, आणि गावातील मंजूर विविध योजने अंतर्गत असलेले विकास कामे लवकरात लवकर प्रत्येक्षात सुरुवात होऊन पूर्ण होऊन गावाचा विकास व्हावा.